ETV Bharat / city

मुंबईत कोरोना रुग्णवाढ सुरूच.. 2982 नवे रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Mar 20, 2021, 8:34 PM IST

मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसात वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

corona positive patient found in mumbai
corona positive patient found in mumbai

मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसात वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. 18 मार्चला 2877 तर 19 मार्चला 3062 रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर आज 2,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

21 हजार 335 सक्रिय रुग्ण -

मुंबईत आज 20 मार्चला 2,982 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 58 हजार 879 वर पोहचला आहे. आज 7 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 572 वर पोहचला आहे. 1,780 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 25 हजार 061 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 21 हजार 335 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 114 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 34 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 302 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 36 लाख 86 हजार 883 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645 रुग्ण आढळून आले होते त्यात वाढ होऊन 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 3 मार्चला 1121, 4 मार्चला 1103, 5 मार्चला 1173, 6 मार्च 1188, 7 मार्चला 1360, 8 मार्चला 1008, 9 मार्चला 1012, 10 मार्चला 1539, 11 मार्चला 1508, 12 मार्चला 1646, 13 मार्चला 1708, 14 मार्चला 1962, 15 मार्चला 1712, 16 मार्च 1922, 17 मार्चला 2377, 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.