मुंबई - शहरातील गोरेगाव पूर्व परिसरातील पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या गटारात पडून 2 जण मृत पावल्याची घटना घडली आहे. अरुणकुमार पटेल (40) आणि मनोज गोस्वामी (42) अशी या दोघांची नावे आहेत. गटारातील एमटीएनएलच्या केबल साफ करताना या दोन्ही कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून चौकशी सुरू केली आहे. स्थानिक पोलिसही या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
हेही वाचा... नाराज आमदारांना बरोबर घेऊन काम करणार; काँग्रेस मंत्र्यांनी घेतली राहुल, सोनिया यांची दिल्लीत भेट
गोरेगाव पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर वनराई पोलीस ठाण्यासमोर हब मॉल समोर गटार आहे. एमटीएनएलच्या केबल या गटारातून टाकल्या आहेत. या गटारांची सफाई कंत्राटी कर्मचारी करत होते. सफाई सुरू असताना एक कर्मचारी गटारात पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा कर्मचारी गटारात उतरला. दोघेही गटारातून बाहेर न आल्याने पोलिसांनी त्यांना बाहेर काढून जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठवले. तेथे या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा... शेतकरी अन् मच्छिमारांना नुकसानीचे ठरले सरते वर्ष..
गोरेगाव पूर्व परिसरातील वनराई पोलीस ठाण्यासमोर असलेल्या 'हब मॉल' समोर ही घटना घडली. 'एमटीएनएल'ने नाल्यावरील झाकण उघडे ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. एमटीएनएल आणि स्थानिक पोलिसांकडून चौकशी आणि तपास सुरू आहे.