ETV Bharat / city

मुंबईच्या प्रियदर्शनी पार्क येथील समुद्रात बुडालेल्या 2 मुलांचा मृत्यू

प्रियदर्शनी पार्क येथील समुद्रात पोहण्यास गेलेल्या पैकी 2 मुले परत न आल्याने त्यांचा शोध घेतला जात होत. मात्र, आता त्यांचे मृतदेह सापडले असून त्यांचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाले आहे.

two children missing in sea at Priyadarshini Park

author img

By

Published : Oct 5, 2021, 9:16 AM IST

Updated : Oct 5, 2021, 12:12 PM IST

मुंबई - दक्षिण मुंबईमधील प्रियदर्शनी पार्क येथील समुद्रात पोहण्यास गेलेल्या 8 मुलांपैकी 2 जण परत न आल्याने त्यांचा शोध सुरू होता. मात्र, आता त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांचे मृतदेह सापडले असून त्यांचे मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

शोध मोहीम सुरू -

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईमधील मलबार हिल, नेपियंसी रोड येथील प्रियदर्शनी पार्क येथे काल सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास 8 मुले पोहण्यासाठी समुद्रात गेली होती. त्यापैकी 6 मुले परत आली. मात्र, 2 मुले परत न आल्याने त्याची माहिती मलबार हिल पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी त्वरित मुंबई अग्निशमन दलाच्या साहाय्याने शोध मोहीम राबवली. समुद्रात वाहून गेलेल्या मुलांना शोधण्यासाठी कोस्ट गार्डचीही मदत घेण्यात आली आहे.

हेही वाचा - भयावह! गाडी आली आणि शेतकऱ्यांना चिरडून गेली, व्हिडीओ व्हायरल

Last Updated : Oct 5, 2021, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.