ETV Bharat / city

Bully Bai App Case : बुली बाई ॲप प्रकरणातील दोघांना 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बुली बाई ॲप प्रकरणातील ( Bully Bai App Case ) दोन आरोपींना वांद्रे न्यायालयाने ( Bandra Court ) 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ( Remanded Police Custody ) सुनावण्यात आली आहे. श्‍वेता सिंग व मयंक रावल, असे त्या आरोपींचे नाव आहे. त्यांना यापूर्वीही चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 10, 2022, 4:29 PM IST

Updated : Jan 10, 2022, 5:31 PM IST

मुंबई - बुली बाई ॲप प्रकरणातील ( Bully Bai App Case ) दोन आरोपींना वांद्रे न्यायालयाने ( Bandra Court ) 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ( Remanded Police Custody ) सुनावण्यात आली आहे. श्‍वेता सिंग व मयंक रावल, असे त्या आरोपींचे नाव आहे. त्यांना यापूर्वीही चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती.

बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपींना मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) उत्तराखंडमधून 7 जानेवारीला मुंबईत आणले होते. त्यावेळी या दोन आरोपी श्‍वेता सिंग, मयंक रावल यांना वांद्रे न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी (दि. 10 जानेवारी) त्यांची पोलीस कठडी संपली असता त्यांना पुन्हा वांद्रे न्यायालयात हजर केले होते. त्यावर न्यायाधीशांनी पोली कोठडीत पुन्हा चार दिवसाची वाढ करुन 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर विशाल कुमार झा याला 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी पाठवण्याचा आदेश ( Judicial Custody ) बांद्रा न्यायालयाने दिला आहे.

बुली बाई एक असे ॲप आहे जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती. या ॲपवर आतापर्यंत 100 मुस्लिम महिलांचे फोटो लावण्यात आले होते. या प्रकरणावरुन विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच अनेकांनी या ॲप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ( Mumbai Police Cyber Cell ) या आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 354 ड, 509, 500, 153 अ, 295 अ, 153 ब, आयटीचे कलम 67 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू केला होता.

हेही वाचा - Sulli Deal App : सुल्ली डील ॲपवर हिंदुद्वेषी मुलींची लागायची बोली ; ट्विटरवरुन घेतला जायचा शोध

Last Updated : Jan 10, 2022, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.