ETV Bharat / city

Tulsi Dam Overflow : पाण्याची चिंता मिटल्याने मुंबईकर ओक्केमध्ये; तुळशी धरणही भरले - तुळशी धरण भरले

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे ७ धरणामध्ये ७८.६३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे तुळशी धरण आज वाहू लागले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे हे तिसरे धरण भरुन वाहू लागले आहे.

Tulsi Dam full
तुळशी धरण भरले
author img

By

Published : Jul 16, 2022, 9:53 PM IST

मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे ७ धरणामध्ये ७८.६३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे तुळशी धरण आज वाहू लागले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे हे तिसरे धरण भरुन वाहू लागले आहे. याआधी मोडक सागर, तानसा ही दोन धरणे भरुन वाहू लागली आहेत.

तुळशी ओव्हर फ्लो - बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव हा आज सायंकाळी ५:४५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला तुळशी हा तिसरा तलाव ठरला आहे. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या २ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला हा पहिलाच तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

मागील वर्षीही आजच भरले होते धरण - ८०४ कोटी लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारे हे धरण गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२१ मध्ये देखील १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागले होते. तर वर्ष २०२० मध्ये २७ जुलै; वर्ष २०१९ मध्ये दिनांक १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागले होते. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक ९ जुलै रोजी; वर्ष २०१७ मध्‍ये दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी धरण ओसंडून वाहू लागले होते.

धरणात ७८ टक्के पाणीसाठा - मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये १,१३,८०९.७० कोटी लीटर (११,३८,०९७ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ७८.६३ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा - अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ६६.८१ टक्के अर्थात १५१६९.९० कोटी लीटर (१,५१,६९९ दशलक्ष लीटर), मोडक-सागर तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२८९२.५० कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी असून आज हा तलाव १०० टक्के भरलेला आहे. तर तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ९९.१८ टक्के अर्थात १४,३८८.७० कोटी लीटर (१,४३,८८७ दशलक्ष लीटर), ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या ८१.५५ टक्के अर्थात १५,७८१.८० कोटी लीटर (१,५७,८१८ दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ७३.८४ टक्के अर्थात ५२,९४९.४० कोटी लीटर (५,२९,४९४ दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ६६.१२ टक्के अर्थात १८३१.३० कोटी लीटर (१८,३१३ दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावांमध्ये पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.