ETV Bharat / city

मुंबईत ५ विभागात क्षयरोग सर्वेक्षण, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागाला पारितोषिक - राष्ट्रीय क्षयरोग निमूलण हा कार्यक्रमाबद्दल बातमी

केंद्र सरकारपडून क्षयरोग मुक्त भारत -2025 हा राष्ट्रीय क्षयरोग निमूलण हा कार्यक्रम लाबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत मुंबई विभागात क्षयरोग सर्वेक्षण केले जाणार आहे.

Tuberculosis survey will be conducted in 5 sections in Mumbai
मुंबईत ५ विभागात क्षयरोग सर्वेक्षण, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागाला पारितोषिक
author img

By

Published : Feb 11, 2021, 9:49 PM IST

मुंबई - केंद्र सरकारकडून ‘क्षयरोग मुक्त भारत-२०२५’ हा राष्ट्रीय क्षयरोग निमूर्लन कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत मुंबई महापालिकेकडून २२ फेब्रुवारीपर्यंत परळ, गोवंडी, घाटकोपर, ग्रँट रोड व प्रभादेवी या ५ परिसरात क्षयरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन दुपारी १ ते सायंकाळी ५ या दरम्यान सर्वेक्षण करणार आहे. या मोहिमेदरम्यान कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने उत्कृष्‍ट कामगिरी करणाऱ्या परिसरांना प्रोत्साहनपर विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकरी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

पाच वर्षांच्या माहितीची शहानिशा -

मुंबईतील पाच क्षयरोग परिसरात गेल्या ५ वर्षात राबवण्यात आलेल्या क्षयरोग नियंत्रणविषयक बाबींची विविध निर्देशांकांच्या आधारे पडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीसाठी केंद्रीय क्षयरोग विभागाद्वारे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमॉलॉजी, चेन्नई’ व ‘इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटीव ऍन्‍ड सोशल मेडीसीन’ या मान्यताप्राप्त संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. आवश्यक ते सर्वेक्षण व पडताळणी ही सुलभतेने करता यावी, यासाठी केंद्र सरकारद्वारे स्वतंत्र भ्रमणध्वनी अॅप तयार करण्यात आले असून त्यामध्ये सर्वेक्षणविषयक माहिती ही महापालिकेच्या पथकांद्वारे नोंदवली जाणार आहे. मुंबईत २०१५ पासून टीबी नोटीफिकेशनमध्ये झालेली तुलनात्मक घट, खासगी क्षेत्रातील क्षयरोग रुग्णांसाठी विकण्यात आलेली औषधे, जिल्हा तालुका युनिटमध्ये विशिष्ट एप्‍लीकेशनद्वारे रुग्ण शोधमोहीम, जिल्हयातील विविध निर्देशकांवर आधारित ‘इंडेक्‍स स्कोअर’ व जिल्हयातील विविध रुग्णालये, औषध विक्रेते यांच्या भेटी घेऊन व त्यांच्यासह ‘फोकस ग्रुप डिस्‍कशन’ करुनदेखील ही पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

अशी राबवली जाणार मोहिम -

महापालिकेची शोध मोहीम राबवण्याकरिता साधारणपणे २५ पथके कार्यरत राहणार आहेत. घरातील व्यक्ती कामानिमित्त वा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास, हे पथक दिवसातील इतर वेळीदेखील भेटी देऊन तपासणी करणार आहेत. प्राथमिक तपासणी दरम्यान आढळणारे, क्षयरोगाचे उपचार घेतलेले रुग्ण, क्षयरोगाचे लक्षणे आढळलेले संशयित व ज्या घरात एखादा क्षयरोग रुग्ण असल्यास त्या घरातील इतर संशयितांच्या बेडक्यांची (कफ) सीबीनॅटद्वारे तपासणी व क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. क्ष-किरण चाचणी ही निर्धारित खासगी क्ष-किरण केंद्रामध्ये मोफत केली जाणार आहे. त्यासाठी संशयित रुग्णाला विशेष 'व्हाऊचर' देण्यात येणार आहे. टीबी असणाऱ्या रुग्णांना औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.