ETV Bharat / city

वाहन प्रमाणिकरण केंद्र व चालक चाचणी ट्रॅकसाठी केंद्राकडून 296 कोटी मंजूर; परिवहन मंत्र्यांची माहिती

10 स्वयंचलित वाहन तपासणी व प्रमाणिकरण केंद्र तसेच 22 स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅकसाठी 296.02 कोटी रूपयांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

anil parab meets nitin gadkari
दिल्लीतील परिवहन भवन येथे अनिल परब यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली.
author img

By

Published : Feb 5, 2020, 11:30 AM IST

मुंबई - महाराष्ट्रातील 10 स्वयंचलित वाहन तपासणी व प्रमाणिकरण केंद्र तसेच 22 स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅकसाठी 296.02 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

दिल्लीतील परिवहन भवन येथे अनिल परब यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. या बैठकीत राज्य शासनातर्फे 10 स्वयंचलित वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्रासाठी 139.80 कोटी तर 22 स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅकसाठी 156.22 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिल्याची माहिती परब यांनी दिली.

प्रथम टप्प्यात राज्यातील विविध भागात 10 स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, ठाणे (कल्याण), नागपूर (ग्रामीण), मुंबई (सेंट्रल), हिंगणघाट (नागपूर), पनवेल, दिवेघाट (पुणे), नांदेड या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

राज्यातील विविध भागात एकूण 50 वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र उभारली जाणार आहेत. त्यापैकी 10 केंद्र तत्काळ सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे यांच्याकडून तांत्रिक साहाय्यता घेतली जाणार आहे. यापैकी मुंबई ईस्ट-कुर्ला येथे महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या जागेवर बांधकाम सुरू असल्याचे परब यांनी सांगितले. नाशिक येथे पथदर्शी प्रकल्पांतर्गत स्वयंचलित वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र 2015 साली सुरू करण्यात आले आहे.

22 मानवरहित ‘स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅक’

राज्यात 22 ठिकाणी मानवरहित ‘स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅक’ सुरू करण्यात येणार असून यासाठी 156.22 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. हे ट्रॅक संपूर्ण संगणकीकृत असतील. यासंदर्भात सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यांना प्रस्ताव पाठवल्याचे परब यांनी सांगितले.

Intro:मुंबई - महाराष्ट्रातील 10 स्वयंचलित वाहन तपासणी व प्रमाणिकरण केंद्र तसेच 22 स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅकसाठी 296.02 कोटी रूपयांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
Body:दिल्लीतील परिवहन भवन येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची आज परब यांनी भेट घेतली. या बैठकीत राज्य शासनातर्फे 10 स्वयंचलित वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्रासाठी 139.80 कोटी तर 22 स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅकसाठी 156.22 कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली, असल्याचे बैठकीनंतर परब यांनी सांगितले.
महाराष्ट्रात प्रथम टप्प्यात राज्यातील विविध भागात 10 स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र उभारली जातील. ही केंद्र कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, ठाणे (कल्याण), नागपूर (ग्रामीण), मुंबई (सेंट्रल), हिंगणघाट (नागपूर), पनवेल, दिवेघाट (पुणे), नांदेड या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

राज्यातील विविध भागात एकूण 50 वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र उभारली जाणार आहेत. त्यापैकी 10 केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे यांच्याकडून तांत्रिक सहायता घेतली जाणार आहे. यापैकी मुंबई ईस्ट-कुर्ला येथे महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतुक मंडळाच्या जागेवर बांधकाम सुरू असल्याचे परब यांनी सांगितले. नाशिक येथे पथदर्शी प्रकल्पातंर्गत स्वयंचलित वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र 2015 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे.

22 मानवरहित ‘स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅक’

राज्यात 22 ठिकाणी मानवरहित ‘स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅक’ सुरू करण्यात येणार असून यासाठी 156.22 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. हे ट्रॅक संपूर्ण संगणकीकृत राहतील. यासंदर्भात सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रांसपोर्ट यांना प्रस्ताव पाठविला असल्याचे परब यांनी सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.