ETV Bharat / city

Transport Minister Anil Parab : 'उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या सुविधेसाठी वाहतूकीचे नियेाजन करा'

कोरोना काळात जो विस्कळीतपणा आलेला आहे तो दूर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतूकीचे नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहे. दरम्यान, संपानंतर कामावर रूजू झालेल्या कामगारांच्या सकारात्मक मानसिकतेसाठी समुपदेशन करावे, असे आवाहनही परब यांनी केले.

Anil Parab
Anil Parab
author img

By

Published : May 6, 2022, 9:16 PM IST

मुंबई - कोरोना आणि संप या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळ गेल्या दोन वर्षात एका वेगळ्याच परिस्थितीशी झुंज देत होते. या काळात जो विस्कळीतपणा आलेला आहे तो दूर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतूकीचे नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहे. दरम्यान, संपानंतर कामावर रूजू झालेल्या कामगारांच्या सकारात्मक मानसिकतेसाठी समुपदेशन करावे, असे आवाहनही परब यांनी केले.

आढावा बैठक आयोजित : सध्या सुट्टीचा मोसम सुरु आहे. या काळात सर्वसामान्य प्रवाशांना अधिकाधिक एसटीची वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी एसटी महामंडळाच्या राज्यभरातील विभाग नियंत्रकांसोबत मुंबईतील मुख्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. वाहतूक सेवा, प्रवाशी संख्या तसेच उत्पन्न वाढविण्याबरोबरच वाहतूक सुरु करण्याबाबत भेडसवणाऱ्या विविध समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी विभाग नियत्रकांची मतेही जाणून घेण्यात आली. या बैठकीसाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळातील विविध विभागाचे महाव्यवस्थापक तसेच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री ॲड. अनिल परब बोलत होते.

परिवहन मंत्र्यांचे आवाहन : गेल्या पाच महिन्यांच्या संपानंतर आपली एसटी पुन्हा सुरू झाली आहे. आपले कर्मचारी संपावर होते म्हणून आपण काही करू शकलो नाही. परंतू आता सर्व वाहतूक पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी, विस्कळलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसण्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन मंत्री, परब यांनी केले. पूर्वी जे भारनियमन होते, त्यात वाढ कशी होईल यासाठी सर्व गोष्टींचे नियोजन करावे, त्यासाठी पूर्वीचे पॅटर्न बदलावे, असे सांगतानाच आवश्यक ठिकाणी महामंडळाकडून योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

'शाळांच्या वेळेचे नियोजन करा' : पुढील महिन्यापासून शाळा सुरु होतील. काही शाळांची वेळ बदललेली असेल. त्यामुळे एकाच मार्गावरील वेगवेगळ्या शाळांसाठी बदललेल्या वेळेनुसार अनेक गाड्या सोडल्या जातात. त्याऐवजी शाळांच्या वेळेचे नियोजन करून बस सोडाव्यात, अशी सूचनाही मंत्री, ॲड. परब यांनी केली. यावर्षी किमान १ हजार इलेक्ट्रीक बसेस आपल्याला सुरू करायच्या आहेत. तो आपला उद्देश आहे, असे सांगतानाच पर्यावरणपूरक अशा २ हजार सीएनजी इंधनावर धावणाऱ्या गाड्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

हेही वाचा - Ludhiana scientist Dr BS Aulakh : कोरोनावर औषध शोधल्याचा पंजाबच्या डॉक्टर औलाख यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.