ETV Bharat / city

Transfer Posting Case : देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची माहिती मुंबई सहआयुक्तांकडे

पोलीस बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी ( Transfer Posting Case ) देवेंद्र फडणवीस यांची आज ( रविवार ) मुंबई ( Devendra Fadnavis Statement Recorded ) सायबर सेलने चौकशी ( Mumbai Cyber Police ) केली. त्यांनतर अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबाची माहिती सहआयुक्त मिलिंद भारंबे ( JT CP milind Bharambe ) यांना देण्यात आली आहे.

devendra fadnavis
devendra fadnavis
author img

By

Published : Mar 13, 2022, 9:36 PM IST

मुंबई - माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई सायबर पोलिसांकडून ( Mumbai Cyber Police ) चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी ( Transfer Posting Case ) देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवला ( Devendra Fadnavis Statement Recorded ) आहे. डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर मुंबई सहआयुक्त मिलिंद भारंबे ( JT CP milind Bharambe ) यांच्याकडे या संपूर्ण चौकशीची माहिती देण्यात आली आहे.

सायबर सेलने देवेंद्र फडणवीस यांना कोणते प्रश्न विचारले याबाबात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रश्नांवर मुंबई पोलिसांचे समाधान होते की नाही, हे पहावे लागणार आहे. जर, फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावर पोलीस समाधानी नसतील, तर त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यांनतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, सायबर सेलकडून मला या प्रकरणात सहआरोपी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस हे मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सोमवारी याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

म्हणून मला नोटील दिली - फडणवीस

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी सभागृहात रोज विषय मांडत आहे. या सरकारच्या मंत्र्याचं दाऊद कनेक्शन, विरोधी पक्षासोबतचं षडयंत्रं याबाबत मी वारंवार बोलत आहे. त्यामुळे त्यांनी मला नोटीस पाठवली. मी कालच सांगितले होते चौकशीसाठी जाणार आहे. मग सरकार आणि पोलिसांकडून विनंती केली आम्ही आपल्याकडे चौकशीसाठी येतो. आमचा स्टाफ पाठवतो. त्यानुसार ते आले, असेही फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा - Mumbai Drug Smuggling : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 1.95 कोटींचे चरस जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.