मुंबई : सध्या मान्सूनचे वातावरण असले तरी जूनमध्ये म्हणावा असा पाऊस पडला नाही. मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसाच्या सरी पडल्यावर पावसाने पाठ फिरवली होती. काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गुरुवारी सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासात मुंबई शहरात ११९.०९, पूर्व उपनगरात ५८.४० तर पश्चिम उपनगरात ७८.६९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
हवामाना विभागाचा अलर्ट : ५ दिवस मुसळधार -
गुजरात व कर्नाटक किनारपट्टीत पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज असल्याचे पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस बरसणार कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले होते. अर्ध्या तासात पाण्याचा निचरा झाल्यानंतर मिलन सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पावसामुळे कुठेही पाणी साचले नसल्याने रस्ते किंवा रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होती अशी माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबईतील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दिवसभरात पडलेला पाऊस : कुलाबा येथे १२५ .६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर सांताक्रुझ येथे ५२.४ मिलिमीटर पाऊस पडला. मुंबईत काल दिवसभरात जोरदार पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने तुंबले होते.तर बरेच ठिकाणी वाहने पाण्यात अडकून पडली होती. मुंबई शहरात ११९.०९ मिलिमीटर नोंद झाली आहे. मुंबईतील पूर्व उपनगरात 58.40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात 78.69 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
काल झालेल्या पावसामुळे मुंबईची वाताहत : काल मुंबईत पावसाने जोरात हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरींनी दक्षिण मुंबईतील तुळशी पाईप रोड, अंधेरी कुर्ला रोड, लिंक रोड, एसव्ही रोड ते पाडेर रोडपर्यंत अनेक ठिकाणी लोक जॅममध्ये अडकले होते. लोकल ट्रेनवरही परिणाम झाला असून, मध्यभागी ट्रेन सुमारे २० मिनिटे उशिराने धावत आहे. मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला पाऊस आज मुंबईत सकाळपासून कोसळतो आहे. संध्याकाळनंतर पावसाची संततधार असल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
मुंबईतील लोअर परेल भागात पाणीच पाणी : मुंबई परिसरात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळी हलक्या स्वरूपाच्या सरी होत्या. मात्र, दुपारनंतर पावसाने जोर धरला असून, संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता. संध्याकाळनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली, तर मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले, लोअर परेल परिसरातही पाणी साचल्याने कार्यालयातून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला.
हेही वाचा : Mumbai Rain : मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ