ETV Bharat / city

Andheri By Election: नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे जनतेचे हाल; अर्ज भरण्याच्या दिवशी अंधेरीत ट्रॅफिक जॅम - मुरजी पटेल

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही उमेदवारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे अंधेरी पूर्व भागात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. (Traffic jam in Andheri)

Breaking News
author img

By

Published : Oct 14, 2022, 4:35 PM IST

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर उद्धव ठाकरे यांच्याकडून ऋतुजा लटके (Rutuja latke) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही उमेदवारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे अंधेरी पूर्व भागात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. (Traffic jam in Andheri)

अंधेरीत ट्रॅफिक जॅम

नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे जनतेचे हाल: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या समर्थनात बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने त्यांना पाठिंबा दिला असून त्यांना आरपीआय आठवले गटाचा सुद्धा पाठिंबा आहे. या अनुषंगाने अंधेरी पूर्व, शेरे पंजाब मैदान येथून मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते. या रॅलीमध्ये महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला. परंतु या रॅलीमुळे ट्राफिकची मोठी समस्या रस्त्यावर निर्माण झाली. या भागामध्ये ट्रॅफिकची समस्या पूर्वीपासून असून आज निघालेल्या प्रचंड रॅलीमुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. एरवी ज्या अंतरासाठी दहा ते पंधरा मिनिटं लागत होती, त्या प्रवासासाठी आज तब्बल दीड ते पावणे दोन तास लागल होते, म्हणून वाहन चालकांमध्ये प्रचंड नाराजी होती.

रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा: दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनामध्ये सुद्धा मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा पाठिंबा दिला असल्याने या रॅलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ अंधेरी पूर्व येथील मालपा डोंगरी, गणपती मंदिर येथून रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूने निघालेल्या या रॅलींमुळे अंधेरी पूर्वेकडील वाहतूक ठप्प झाली होती व रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.

जनतेत नाराजी: या ट्रॅफिक जॅम वर नाराजी व्यक्त करत अंधेरीतील रहिवासी रमेश कदम म्हणतात की, अशा पद्धतीच्या शक्ती प्रदर्शनामुळे वाहतुकीवर फार मोठा परिणाम होतो. अशा रॅल्यांचं पोलिसांनी व्यवस्थित नियोजन करायला हवं, तसेच राजकीय पक्षांनी सुद्धा जनतेला होणार त्रास लक्षात घ्यायला हवा. तर गृहिणी मालती ठोंबरे म्हणतात की, मुलांना शाळेत वेळेवर पोहोचायचं असतं. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. ते विद्यार्थी शाळेत वेळेवर कसे पोहोचतील? त्यासाठी सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा असेही त्या म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.