मुंबई - गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा महत्त्वाचा सण. गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या आणि एसटी बसेस तुडुंब भरूनच जातात. कोकणातून मुंबई नोकरीसाठी आलेल्या चाकरमानी माणसांनी हा सण मुंबईतही मोठ्या उत्साहात ( Ganeshotsav Mandal Mumbai ) आणि दणक्यात साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रेरणेतून मुंबई सर्वात पहिला गणेशोत्सव साजरा करण्यात आला तो गिरगाव येथील केशवजी नाईकांच्या ( Keshavji Naik Chawl Ganapati ) चाळीत. या चाळीत अगदी चाळीच्या गॅलरीत सुरू झालेला गणेशोत्सव हळूहळू पटांगणात आला. मात्र त्याचे उत्सव स्वरूप आणि परंपरा बदलल्या नाहीत. 130 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो आहे.
1893 मध्ये गणेशोत्सवाची स्थापना : लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून 893 मध्ये केशवजी नायकांच्या चाळीत गणेशोत्सवाची सुरुवात झाली मुंबईतील पहिला गणेशोत्सव हळूहळू व्यापक रूप घेऊ लागला. 807 62 च्या दरम्यान तत्कालीन खतनाम व्यापारी केशवजी नायक यांनी गिरगाव येथे उभारलेल्या चाळींमध्ये मध्यमवर्गीय मराठी लोक आजही राहतात. गेल्या दीडशे वर्षांपासून या चाळी आजही तितक्यात खंबीरपणे आणि दिमाखात उभ्या आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर इंग्लंड मधल्या वृत्तपत्रातही या गणेशोत्सवाची चर्चा झाली, अशी माहिती गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष मंगेश पोकळे यांनी दिली. हा गणेशोत्सव साजरा करताना अनेक अडचणींना इथल्या रहिवाशांना तोंड द्यावे लागले. मात्र मेहनत आणि जिद्दीने आजवर हा उत्सव भक्तिभावाने अखंडपणे साजरा होतो आहे. सध्या गणेशोत्सवाला अत्यंत बटबटीत आणि इव्हेंटचे स्वरूप आले आहे. मात्र असे असतानाही या गणेशोत्सव मंडळांनी आपले परंपरागत रूप आणि वेगळेपण कायम जपले आहे. आजही इथे प्रवचन, कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रम होत असतात.
सामाजिक बांधिलकी कायम : या गणेशोत्सव मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी कायम जोपासली आहे. आजही हे गणेशोत्सव मंडळ व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती घेत नाही. तसेच मंडळाकडे असलेल्या निधीमधून अनेक आरोग्य शिबिरे ग्रामीण भागात जाऊन वृक्षारोपण आणि जेव्हा जेव्हा आपत्ती आणि संकट येते तेव्हा तेव्हा आम्ही मदतीला धावून जातो, असे पोकळे सांगतात.
थोरा मोठ्यांचा सहवास : केशवजी नाईकांच्या चाळी सुमारे दीडशे खोल्या आहेत. या चाळीच्या माध्यमातून अनेक चळवळी आणि सामाजिक उपक्रमांची आखणी झाली. या चाळीमध्ये कविवर्य केशवसुत आद्य कामगार नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे वीर वामनराव जोशी मुंबई इलाख्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेड आणि ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी आनंदजी हे काही काळ वास्तव्यास होते. तसेच विनायक दामोदर सावरकर यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर यांच्या पर्यंत अनेक दिग्गजांनी या चाळीच्या गणेशोत्सवाला हजेरी लावली आहे, अशी माहिती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सातपुते यांनी दिली.
हेही वाचा- Varalakshmi Vrat 2022 : वरदलक्ष्मी व्रत कसे करावे; घ्या जाणून