ETV Bharat / city

VIDEO : अरे बाबा जीव महत्त्वाचा, कार आपण नंतर घेऊ; रस्त्यात कारला लागलेली आग पाहून मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा

author img

By

Published : Sep 13, 2022, 8:22 AM IST

Updated : Sep 13, 2022, 10:42 AM IST

एका फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कारने सोमवारी मध्यरात्री पेट घेतला. याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने जात होता. रस्त्यात कार जळतेय हे पाहून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि कारमालकासोबत बातचीत केली.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - मुंबई एअरपोर्टजवळ एका फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कारने सोमवारी मध्यरात्री पेट घेतला. याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने जात होता. रस्त्यात कार जळतेय हे पाहून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि कारमालकासोबत बातचीत केली.

कार चालकाला धीर देताना मुख्यमंत्री शिंदे

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे, असे म्हणत कारचालकाला धीर दिला. गाडी आपण नवीन घेऊ, पण जीव जास्त महत्त्वाचा आहे, असे त्यांनी कारमध्ये असलेल्यांना म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्री पुढे रवाना झाले. यावेळी कारचालकानेही मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केल्याने त्यांचे आभार मानले. तसेच त्या युवकाला मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला दिल्या.

Last Updated : Sep 13, 2022, 10:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.