ETV Bharat / city

राज्यात कोरोनामुळे 131 पोलिसांचा मृत्यू; 10,492 पोलीस कोरोनामुक्त

आतापर्यंत राज्यात 10,492 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये 1,041पोलीस अधिकारी तर 9,450 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 131 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनामुळे 131 पोलिसांचा मृत्यू
राज्यात कोरोनामुळे 131 पोलिसांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 20, 2020, 3:44 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करणारे महाराष्ट्र पोलीस दलाचे कोरोना योध्येही कोरोनाचे बळी ठरताना दिसत आहेत. आतापर्यंत राज्यात 131 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 12,877 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 1,358 पोलीस अधिकारी, तर 11,519 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2,255 पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असून, यात 305 पोलीस अधिकारी तर 1,950 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आतापर्यंत राज्यात 10,492 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये 1,041पोलीस अधिकारी तर 9,450 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 131 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2,31,163 गुन्हे दाखल केले असून, राज्यभरात क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 829 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यभरात 335 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 890 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. राज्यात, अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून, आतापर्यंत 33 हजार 575 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.

आतापर्यंत पोलिसांनी 95,921 वाहने जप्त केली असून, तब्बल 21 कोटी 60 लाख 67 हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 68 घटना घडलेल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.