मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
राज्यात गेल्या काही दिवासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील चार दिवस राज्यात काही भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा जोर काही हळूहळू वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसू शकतात, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाचे क्षेत्र याला कारण ठरत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने राज्यात 29 आणि 30 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
हेही वाचा - आगामी दहीहंडी अन् गणेशोत्सवासाठी स्थानिक निर्बंध लावण्याची केंद्राच्या महाराष्ट्राला सुचना