ETV Bharat / city

Top 10 @ 11 PM : रात्री ११ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

top 10
आजच्या महत्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jul 4, 2021, 6:54 AM IST

Updated : Jul 4, 2021, 10:57 PM IST

मुंबई - प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. खेळीमेळीच्या वातावरणात विरोधक आणि सत्ताधारी चहापान करत अधिवेशनाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. मात्र, सध्या राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 5 जुलैला होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. तर, तिथेच अधिवेशनात मांडले जाणारे ठराव, तसेच महत्त्वाच्या विधेयकांबाबत माहिती देण्यासाठी घेतली जाणारी पत्रकार परिषदही मुख्यमंत्र्यांकडून टाळण्यात आली आहे. सविस्तर वाचा...

मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी ५ जुलै आणि ६ जुलै २०२१ असे दोन दिवस चालणार आहे. या दोन दिवसांत ठाकरे सरकारकडून ५ नवी विधेयके तर २ प्रलंबित विधेयकेही मांडली जाणार आहेत. विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे, विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत. सविस्तर वाचा...

मुंबई - कोरोनाच्या नावाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाहीला कुलूप लावण्याचे काम करण्यात येत आहे. हे सरकार अधिवेशनाला तोंड न देता पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे, असा जोरदार हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर केला. अधिवेशनात १०० पेक्षा अधिक मुद्दे आम्ही मांडणार होतो, मात्र पुरवण्या मागण्यांमध्ये आम्हाला हे विषय मांडू दिले जाणार नाही. त्यामुळे हे मुद्दे रस्त्यावर, लोकांमध्ये जाऊन मांडू, असेही फडणवीस यांनी ठणकावले. सविस्तर वाचा...

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेल्यावर्षी धारावी हॉटस्पॉट बनली होती. मात्र, याच धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रविवारी (4 जुलै) चौथ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षभराच्या कालावधीत धारावीत 10 वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, धारावीत सध्या २२ सक्रिय रुग्ण आहेत. सविस्तर वाचा...

श्रीनगर - जम्मूमधील हवाई दल स्टेशनवर ड्रोनद्वारे हल्ला झाला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगरमध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी असा आदेश जारी केला असून पोलिसांना ड्रोन संबंधित कामांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. जिल्ह्याच्या प्रदेश कार्यक्षेत्रात ड्रोन किंवा तत्सम इतर उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे, असे श्रीनगरचे जिल्हाधिकारी मोहम्मद एजाज यांनी सांगितले. सविस्तर वाचा...

मुंबई - कोरोना संकटामुळे राज्याची आर्थिक घडी डबघाईला आली असताना, ठाकरे सरकार मात्र प्रसिद्धीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत आहे. गेल्या १६ महिन्यांत सुमारे १५५ कोटींचा खर्च प्रसिद्धीवर केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. ठाकरे सरकार फडणवीस सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असल्याचे बोलले जात आहे. सोमवारपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा कळीचा ठरणार असल्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा...

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यात भेट झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू होती. यासंदर्भात स्वत: संजय राऊत यांनी खुलासा केला असून, अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे म्हंटले आहे. मात्र, संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत यांनी 'हमारी अफवाह के धुए वही से उठते है, जहा हमारे नामसे आग लग जाती है', अशी शायरी लिहिलेला एक फोटो ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा...

नागपूर - नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयात 12 दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. या बाळाची जन्मानंतर पाच दिवसांनी प्रकृती गंभीर झाली होती. त्याला कोरोनाही झाला होता. यामुळे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाने मृत्यू झालेले सर्वात कमी वयाचे हे पहिलेच बाळ असल्याचे बोलले जात आहे. सविस्तर वाचा...

धार (मध्य प्रदेश) - तांडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळवा गावचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन युवतींसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक मुलींना काठ्यांनी जबर मारहाण करीत आहेत. मारणारी मुले ही मुलींच्या नात्यातील असल्याचे म्हटले जात आहे. कळस म्हणजे, लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले, मात्र कोणीच त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. फोनवर मुलांशी बोलल्यामुळे या मुलींना मारहाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि मुलींचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पाहा व्हिडिओ...

यवतमाळ - मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या एका शेतकरी पुत्राने चक्क इंग्लंडमधील जवळपास 45 लाखांची स्कॉलरशिप मिळवली आहे. राजू केंद्रे असे या शेतकरी पुत्राचे नाव असून त्याने इंग्लंडमधील प्रतिष्ठित 'चेवनिंग' ही स्कॉलरशिप मिळवली आहे. 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने राजू केंद्रेशी संवाद साधला. यावेळी या तरुणाने आपल्या जीवनातील संघर्ष ते आतापर्यंतचा प्रवास सांगितले. सविस्तर वाचा

Last Updated : Jul 4, 2021, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.