ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 गणेशभक्तांना बाप्पा पावला कोकणात जाण्यासाठी टोल माफीची सवलत - राज्य शासनाने अध्यादेश काढला

गणेशोत्सवासाठी Ganeshotsav कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी सवलतीचा Toll concession for devotees to go to Konkan निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. येत्या २७ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून ११ सप्टेंबरपर्यंत ही सवलत असणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील अध्यादेश काढला आहे The state government issued an ordinance.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Aug 26, 2022, 6:37 PM IST

मुंबई गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले होते. त्यानुसार २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना टोलमाफीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

Ganeshotsav 2022 आले अपंगत्व तरी हारली नाही जिद्द, पुण्यातील हा युवक आज बनवत आहे आकर्षक बाप्पाची मूर्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.