आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवार 17 सप्टेंबर) रोजी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान, मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे त्यांच्या हस्ते आखिल भारतीय वृक्षारोपण अभियान 2021 अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर अमित शाह हे आयोजित सैनिकांच्या संमेलनात उपस्थित राहणार आहेत.
- आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस, औरंगाबाद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
- कोविड - १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेंतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज (१७ सप्टेंबर) रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द विराट कोहलीने याची माहिती दिली. विराट कोहलीने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल भावूक होऊन सविस्तर पोस्ट लिहिली आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी २७४०, मंगळवारी ३५३०, बुधवारी ३७८३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यात आज गुरुवारी १६ सप्टेंबरला किंचित घट होऊन ३५९५ रुग्ण आढळून आले आहेत. आज ४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३२४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सविस्तर वाचा...
- औरंगाबाद - आम्ही आता सत्तेत नाहीत मात्र देवाच्या कृपेने सत्तेत आलो तर नक्कीच बँकांचे पैसे बुडू देणार नाही असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. बँकांनी सरकार सोबत काम करणे कधीही उत्तम आणि फायद्याचे आहे. किमान सरकार दिवाळखोर होत नाहीत, मात्र यासाठी सरकार, कंत्राटदार आणि बँक एक मॉडेलची गरज आहे. त्यातून पायाभूत सुविधा आणि विकास गती घेईल, आणि आमची सत्ता आल्यावर आम्ही ते करू असे फडणवीस म्हणाले. बँक मंथन परिषदेसाठी फडणवीस औरंगाबादेत आले होते यावेळी ते बोलत होते. सविस्तर वाचा...
- मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून सुरू आहे. या काळात विषाणूने अनेक रूप बदलले आहेत. यासाठी मुंबईत जिनोम सिक्वेसिंग करण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यात ३७६ तर दुसऱ्या टप्प्यात १८८ नमुन्यांपैकी 'डेल्टा प्लस' विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. सविस्तर वाचा...
- लखनऊ - केंदीय औषध संशोधन संस्था (सीडीआरआय) लखनऊ यांनी कोरोनावर मात करणाऱ्या औषधाचा शोध लावला आहे. येथील शास्त्रज्ञांनी उमिफेनोविर औषधाच्या (umifenovir drug) तिसऱ्या टप्पातील क्लिनिकल ट्रायल हे यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की उमिफेनोविर हे कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणविरहीत रुग्णांवर उपचारात प्रभावशाली ठरले आहे. तर मध्यम आणि जास्त जोखिम असलेल्या रुग्णांच्या उपचारातही मदतगार आहे. तसेच हे औषध पाच दिवसात व्हायरलचा नायनाट करण्यात सक्षम आहे. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -