मुंबई - 'शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करत आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी', असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
MAHARASHTRA BREAKING LIVE : भाजपशी जुळवून घ्या, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी - maharashtra latest news
20:10 June 20
शिवसेनेने भाजपशी युती करावी, सरनाईकांच्या भूमिकेचे स्वागत - रामदास आठवले
19:31 June 20
प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत वितृष्ट येणार नाही - जयंत पाटील
सांगली - प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे मोठी खळबळ उडाली आहे, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे वितृष्ट निर्माण होणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.याबाबत मंत्री पाटील म्हणाले की, प्रताप सरनाईक यांनी काय पत्र पाठवले ते आपल्याला माहित नाही, मात्र आपण खासगीत अनेकदा ऐकले आहे की, प्रताप नाईक यांची भावना आघाडी टिकवण्याची आहे. तर शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये कोणी गेल्याची माहिती नाही, पण त्यांच्या मतदारसंघात तसा काही प्रयत्न झाला आहे का, हे तपासावे लागले. आपणास या प्रकरणाबाबत अद्याप पूर्ण माहिती नाही, त्यामुळे यावर बोलणे योग्य होणार नाही.
19:12 June 20
काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढवणार, महाविकासआघाडी कायमस्वरुपी नाही - पटोले
पुणे - राज्यात सत्ता स्थापण करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र ही आघाडी कायमस्वरूपी नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
17:01 June 20
प्रताप सरनाईकांच्या पत्रावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया, संजय राऊत म्हणतात..
मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक यांच्या पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे नमूद आहे. हा आरोप गंभीर असून सर्वांनी त्याचा अभ्यास करावा, असे राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आघाडीच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून विनाकारण त्रास देण्यात येत असल्याची खदखद प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
16:39 June 20
प्रताप सरनाईक यांची भूमिका सच्च्या शिवसैनिकाचीच - चंद्रकांत पाटील
पुणे - प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे आणि जर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विनंतीचा विचार केला तर आमचे नेतेही विचार करतील, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर दिली आहे.
पाटील म्हणाले, की आम्हीही तेच म्हणत होतो प्रताप सरनाईक यांनी मांडलेले मत सच्च्या शिवसैनिकाची भावना आहे. हेच आम्ही त्यांना 18 महिन्यांपूर्वी सांगत होतो. ज्यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर लढले. तुम्ही त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. तुम्ही जे काही करत आहात, ती आघाडी अनैतिक आहे किंवा अनसायंटिफिक आहे.
15:20 June 20
मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांची सर्वोच्च न्यायालयात धाव, पुनर्विचार याचिका दाखल
मुंबई - मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही दाखल केली असून न्यायालय यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लागले आहे.
15:08 June 20
भाजपशी युती केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फायदा होईल, शिवसेना आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून भाजपशी जुळवून घेण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे. तसेच मुंबई पालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल असेही सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
15:04 June 20
समोर तुरुंग दिसू लागल्यानेच प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - किरीट सोमय्या
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असे प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा बॉम्ब सरनाईक यांनी या पत्रातून टाकला आहे. यावर भाजप नेते किरीट सोमैया यांनी सणसणीत टोला लगावला असून तुरुंग दिसत असल्यानेच सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे म्हटले आहे.
12:49 June 20
ठाण्यात २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
- डोंबिवली कल्याण येथून १४६६ इतक्या मोठ्या प्रमाणात LSD पेपर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ठाणे क्राईम ब्रांचने केलेली ही ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंतची मोठी कारवाई आहे. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर डोंबिवलीतील अमली पदार्थ तस्करी आणि विक्री होत असल्याने रहिवाशी भागात एकच खळबळ उडाली आहे.
10:05 June 20
अंगावर आला तर शिंगावर घेऊ, ही महाराष्ट्राची संस्कृती - संजय राऊत
अंगावर आला तर शिंगावर घेऊ, ही महाराष्ट्राची संस्कृती -
राजकारणासाठी राजकारण आणि विरोधासाठी विरोध करू नये
शिवसेना कोणत्याही लढाईसाठी तयार आहे-
स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रसने गोंधळातून बाहेर यावे-
राज्यात शातंता राखण्यासाठी सर्वच पक्षांनी आपआपली जबाबदारी समजून घ्यावी
विरोधकांच्या पोटदुखीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औषध दिलेय-
06:15 June 20

मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर 20 जून 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी अप डाऊन मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते वैतरणा दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.