ETV Bharat / city

आषाढी यात्रेसाठी इंसीडेंट कमांडर अधिकारी नियुक्त - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Big breaking
Big breaking
author img

By

Published : Jul 15, 2021, 6:56 AM IST

Updated : Jul 15, 2021, 8:49 PM IST

20:46 July 15

आषाढी यात्रेसाठी इंसीडेंट कमांडर अधिकारी नियुक्त - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे -  आषाढी यात्रेसाठी पुणे जिल्ह्यातून  श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री. संत तुकाराम महाराज संस्थान, श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान व श्री. संत चांगवटेश्वर देवस्थान या चार पालख्या 8 बसेसद्वारे प्रस्थान करणार आहेत. आषाढी यात्रेसाठी इंसिडेंट कमांडर अधिकारी नियुक्त  करण्यात आल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.  

18:57 July 15

शेतातून बैलगाडीने घरी परतणारे दाम्पत्य मुसळधार पावसामुळे नाल्याच्या आलेल्या पुरात गेले वाहून

जळगाव - शेतातून बैलगाडीने घरी परतणारे दाम्पत्य मुसळधार पावसामुळे नाल्याच्या आलेल्या पुरात वाहून गेले आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथे ही घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने पत्नी बचावली तर पुरुष अद्याप बेपत्ता आहे. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी तहसीलदार व पोलीस दाखल झाले आहेत.  

18:29 July 15

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द; 'आरबीआय'चे आदेश

निलंगा (लातूर) - लातूरच्या निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातले आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने बुधवारी जारी केले आहेत.  

राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाने निलंगा येथे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँक आहे. या बँकेकडे पुरेसा भांडवलाचा अभाव आणि भविष्यातील मिळकतीत बँकेकडून असणारी वाढीची शक्यता धूसर असल्या कारणास्तव 'रिझर्व्ह  बँक ऑफ इंडिया'ने बुधवारी आदेश जारी केले. यात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करीत असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय गुरुवार (15 जुलै) पासून सदरील बँकेला आगामी काळात कसलाही अर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे नमुद केले आहे. 

17:22 July 15

कृषी कायद्यांसंदर्भात शरद पवार यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सह्याद्री अतिथीगृहात कृषी कायद्यांसंदर्भात बैठक सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीनंतर शरद पवार हे मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. तसेच एकनाथ खडसे हेदेखील सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित आहेत. 

17:11 July 15

गोवंडी येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून गदारोळ

मुंबई - गोवंडी येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावरून पालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या ऑनलाईन सभेत प्रस्ताव प्रशासनाकडे फेर विचारासाठी पाठवला आहे. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांनी ठरावाची सूचना मांडली होती. पालिकेने होकार कळवल्यावर हिंदुत्ववादी धार्मिक संघटनांनी विरोध केला होता. टिपू सुलतान हे नाव न देण्याच्या मागणीसाठी भाजपचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले. 

16:26 July 15

डोंबिवलीमधील लक्ष्मी निवास इमारतीला आग; अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

डोंबिवली - आज (१५ जुलै) दुपारी १४:५५ वाजताच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकजवळील मे. कामत मेडिकल समोरील लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. सदर घटनास्थळी डोंबिवली अग्निशामक दलाचे जवान २-फायर वाहन व ३-वॉटर टँकर, तसेच एम.आय.डी.सी. अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटनेत अद्यापपर्यत कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती डोंबिवली अग्निशामक केंद्राकडून सांगण्यात आली आहे. 

15:32 July 15

नागपुरातील रस्त्यांवर रात्रीच्यावेळी गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी राडा घातला; 13 जणांना अटक

नागपूर -  नागपूरच्या मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी राडा घातला. हातात शस्त्र आणि तलवारी नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीस ते चाळीस गुंड राडा घालत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना घडली आहे. अनेक दुचाकींवरून निघालेल्या या गुंडांचा तमाशा साधारणपणे एक तास सुरू होता. आरोपी दुचाकींवरून रस्त्याने आपली दहशत माजवत असताना समोर पोलीस दिसताच सर्व आरोपी वेगवेगळ्या मार्गाने पळून गेले. मात्र,पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत १३ आरोपींना अटक करत,शस्त्र जप्त केले आहेत. 

15:01 July 15

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

मुंबई - दहावी परीक्षेचा निकाल उद्या(16 जुलै) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यासंदर्भातली घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 

13:22 July 15

केंद्रीय आरोग्य पथक ठाण्यात दाखल; कोरोना परिस्थितीचा जाणून घेतला आढावा

ठाणे- ठाण्यात केंद्रीय आरोग्य पथक दाखल झाले आहे. आज सकाळीच केंद्रीय आरोग्य पथकाने राज्य आरोग्य पथकाची भेट घेतली. त्यानंतर ठाण्यातील कोरोना परिस्थितीचा केंद्रीय पथकाकडून आढावा घेतला जात आहे. ठाणे महानगरपालिका येथिल नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे हे पथक आढावा घेत असून केंद्रीय पथक समाधानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

13:06 July 15

शरद पवारांकडेच महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल; त्यांच्यावर नाराज नाही - पटोले

12:32 July 15

राज्यातही तिसरी आघाडी? शेकाप कार्यलयात छोट्या पक्षांची स्वतंत्र बैठक

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, हितेंद्र ठाकूर, जयंत पाटील, अबू आझमी, अशोक ढवळे आदी घटकपक्षांची बैठक सुरू, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूमिका विषयी चर्चा करण्यात येणार आहे. बलार्ड पियर शेकाप कार्यलयात विविध पक्षांची स्वतंत्र बैठक सुरू झाली आहे. 

12:11 July 15

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर राष्ट्रवादीत

मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या पुढाकारने खंबाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे.  

12:02 July 15

महाविरोधात काँग्रेस नेते राज्यपालांना देणार निवेदन, सायकलवर जाणार पटोले

काँग्रेस आंदोलन
काँग्रेस आंदोलन

मुंबई -  काँग्रेस नेते राज्यपालांना भेटून महागाईच्या विरोधात निवेदन देणार आहेत. सायकलवर जाऊन राज्यपालांना निवेदन देणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, असलम शेख, विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते या सायकल मोर्चामध्ये सहभागी आहेत.

10:47 July 15

शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार ही माहिती निराधार- नवाब मलिक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील ही माहिती निराधार असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे. ही माहिती जाणीवपूर्वक पेरली असल्याचेही मलिक यावेळी म्हणाले

10:44 July 15

अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुूरू करू; खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने दि. १७ जून रोजी बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता. मात्र त्या वेळेत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आमचा लढा पुन्हा सुरू करू असा इशारा - खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.  

10:41 July 15

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

छगन भुजबळ यांनी घेतली माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांचे सोबत माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित देखील होते. ओबीसींच्या स्थगित झालेल्या राजकीय आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून डाटा मिळवून द्यावा अशी मागणी छगब भुजबळ करत आहेत. ओबीसिंचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी भुजबळ सातत्याने प्रयत्नशील

10:01 July 15

परबीर सिंह याच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एसीबीला परवानगी

महाराष्ट्र सरकारने राज्य लाचलूचपत विभागाला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात इतर पोलिसांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.

09:53 July 15

देशात बुधवारी 41 हजार 806 नवीन कोरोनाबाधितांची भर

नवी दिल्ली - भारतात बुधवारी एकूण 41,806 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे. तर  39,130 जण बरे होऊन परतले आहेत. तसेच 581 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्यस्थतिती देशात कोरोना बाधितांचा एकूण आकडा 3 कोटी 09 लाख 87 हजार 880 वर पोहोचला आहे. तर  3 कोटी 01 लाख 43 हजार 850 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्य स्थतिती देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 4,32,041 इतकी असून मृतांचा आकडा  4,11,989 वर पोहोचला आहे. 

देशात आतापर्यंत एकूण 39 कोटी 13 लाख 40 हजार  491 जणांना लस देण्यात आली आहे. तर मागील 24 तासात एकूण 34 लाख 97 हजार 058 नागरिकांना लस देण्यात आली आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढून 97.28% वर पोहोचला आहे. 

09:05 July 15

दुकाने खुली करण्यासाठी कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित होण्याचा राज्यात सर्वाधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. मात्र, यावरून आता कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. पोलीस बोलवा किंवा आर्मी बोलवा, उद्यापासून दुकाने सुरू असा इशारा व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

09:05 July 15

अलिबाग उरण मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

अलिबाग उरण मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज निधन झाले. झिरास ग्रामपंचायतीचे सरपंच ते आमदार अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. 

07:33 July 15

कोरोना मुक्त गावांमध्ये आज वाजणार शाळेची घंटा

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेचे धडे ऑनलाईनच गिरवले जात होते. मात्र, आता राज्यशासनाने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जी गावे कोरोनामुक्त आहेत. किंवा ज्या गावात एक महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, अशा गावात आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आजपासून शाळा सुरू होत आहेत. 

06:16 July 15

BIG BREAKING

मुंबई-इंधन दरवाढ सुरूच असून मुंबईत आज पेट्रोलचे दर 107.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.45 प्रतिलिटर इतका झाला आहे. राज्यात देखील याच प्रमाणे कमी अधिक प्रमाण इंधनाचे दर आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

Last Updated : Jul 15, 2021, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.