मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून ( Corna Thired Wave ) कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. आज शनिवारी २०१ नव्या रुग्णांची ( Today Mumbai Corona Patient Number ) नोंद झाली आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, असे सलग तीन दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली होती, आज शनिवारी १ मृत्यूची ( Todays Corona Death Number In Mumbai ) नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १६३२ सक्रिय रुग्ण आहेत.
२०१ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१९ फेब्रुवारीला) २०१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ३४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५५ हजार ३९४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३४ हजार २०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६३२ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २८७० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०२ टक्के इतका आहे.
९७.७ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या २०१ रुग्णांपैकी १७४ म्हणजेच ८७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ४ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,३१५ बेडस असून त्यापैकी ८२२ बेडवर म्हणजेच २.३ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९७.७ टक्के बेड रिक्त आहेत.
१२ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा - D Company re-activates : डी कंपनी पुन्हा सक्रिय मनी लाँडरिंग सिंडिकेटमध्ये डिजिटल वॉलेट, डार्कनेटचा वापर