ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 454 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 10 रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट

राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात ( Maharashtra Corona Under Control ) आली असली, तरी ओमायक्रोनच्या रुग्णात दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. आज दिवसभरात 454 संसर्ग ( Today Corona Patient Number ) बाधितांची नोंद झाली.

Maharashtra Corona Under Control
Maharashtra Corona Under Control
author img

By

Published : Mar 5, 2022, 7:07 PM IST

Updated : Mar 5, 2022, 7:35 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात ( Maharashtra Corona Under Control ) आली असली, तरी ओमायक्रोनच्या रुग्णात दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. आज दिवसभरात 454 संसर्ग ( Today Corona Patient Number ) बाधितांची नोंद झाली. शुक्रवारी हा आकडा 206 इतका होता. तर कोरोनाचे 353 रुग्ण सापडले असून त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

आज 454 नवे कोरोनाबाधित -

राज्यात ओमयक्रोन बाधितांची संख्या वाढू लागली आहे. आज 454 नवे बाधित आढळून आले. हे सर्व रुग्ण नागपूर हद्दीतील आहेत. शुक्रवारी 206 रुग्णांची नोंद झाली होती. आज दुप्पट रुग्ण सापडले आहेत. तर मंगळवारी 104, बुधवारी 38, गुरुवारी 234 रुग्ण सापडले होते. राज्यात आजपर्यंत 5 हजार 665 एवढे रुग्ण आहेत. त्यापैकी 4733 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 9582 जणांची जनुकीय चाचणी केली. 9398 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 184 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

दुसरीकडे कोरोनाचे 535 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.82 टक्के इतके आहे. दिवसभरात 963 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.7 टक्के आहे. आजपर्यंत बरे होऊन घरी परतणारे 77 लाख 16 हजार 674 इतके आहेत. कोविडचे निदानासाठी 7 कोटी 82 लाख 14 हजार 557 चाचण्या आजपर्यंत केल्या. त्यापैकी 10.6 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 68 हजार 451 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 हजार 25 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 589 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 4 हजार 38 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

  • मुंबई महापालिका - 65
  • ठाणे - 3
  • ठाणे मनपा - 13
  • नवी मुंबई पालिका - 9
  • कल्याण डोबिवली पालिका - 2
  • मीरा भाईंदर - 3
  • वसई विरार पालिका - 0
  • नाशिक - 13
  • नाशिक पालिका - 10
  • अहमदनगर - 16
  • अहमदनगर पालिका - 12
  • पुणे - 53
  • पुणे पालिका - 131
  • पिंपरी चिंचवड पालिका - 30
  • सातारा - 19
  • नागपूर मनपा - 7

हेही वाचा - Disha Salian Case : मालवणी पोलीस ठाण्यात राणे पितापुत्रांची तब्बल 5 तासांपासून चौकशी; पोलीस ठाण्याबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश

Last Updated : Mar 5, 2022, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.