नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन हे येत्या 19 जुलैपासून सुरू होणार आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून होणार सुरू
21:19 July 02
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून
20:10 July 02
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 25 जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल
सोलापूर - आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 25 जणांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवानगी सोलापुरात घोंगडी बैठका घेतल्या असल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी आहे, तरी देखील 30 जून रोजी बुधवारी या बैठका घेतल्या होत्या.
19:59 July 02
गुजरात पोलीस चोराच्या शोधात भिवंडीत; चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने चोराचा मृत्यू
ठाणे - गुजरात पोलीस चोराच्या शोधात भिवंडीत आले होते. यावेळी पोलीस आणि चोरामध्ये झटापट झाली. त्यानंतर चोराने चौथ्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारली. त्यातच त्या चोराचा जागेवर मृत्यू झाला आहे. निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
19:55 July 02
ईडीची कारवाई राजकीय हेतूने नाही - देवेंद्र फडणवीस
नागपूर - मी दिल्लीला कुठल्याही कारणाने गेलो तरी मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते. या पतंगबाजीचा मी दिवसभर आनंद घेतला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यापूर्वी अनेक चौकशा झाल्या आहेत. मात्र, त्यात काहीही झालेलं नाही, असे अजित पवार म्हणाले होते. यावर फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाची सुरुवात उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली, राजकीय हेतूने चौकशी झालेली नाही. कुठलाही पक्ष चौकशीची मागणी करतो, घटना घडली म्हणून चौकशी करा असे म्हणतो. यात भाजपने असा ठराव नाही घेतला की दोषी ठरवा, असे फडणवीस यांनी सांगितले.
19:31 July 02
देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीने घेतला अचानक पेट
नागपूर - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली आहे.
17:14 July 02
सीबीएसईच्या धर्तीवर बारावीचे मूल्यमापन होणार
मुंबई - सीबीएसईच्या धर्तीवर बारावीचे मूल्यमापन होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने बारावी परिक्षेच्या मूल्यमापनाची पद्धत जाहीर केली आहे.
15:37 July 02
रुग्ण संख्येचा आढावा घेऊन नियम शिथिल केले जातील - राजेश टोपे
औरंगाबाद - राज्यातील कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन नियम शिथिल केले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच राज्यात एक हजार नवीन रुग्णवाहिका खरेदी करणार आहोत. लसीकरण मोठ्या प्रमाणात करणे शक्य असून, केंद्राने लसींचा पुरवठा वाढवावा, अशी मागणीही टोपे यांनी केली आहे. डेल्टा प्लसचे आतापर्यंत 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर 20 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत, असे टोपे यांनी सांगितले.
15:30 July 02
अभिनेत्री यामी गौतमला ईडीने बजावला समन्स
मुंबई - अभिनेत्री यामी गौतम ईडीच्या रडारवर आहे. यामी गौतमला ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. 7 जुलै रोजी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना यामीला देण्यात आल्या आहेत. FEMA (Foreign Exchange Management Act ) कायदा उल्लंघन प्रकरणी समन्स बजावला आहे.
15:13 July 02
Maharashtra Breaking News Live
सातारा : अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आज मोठी कारवाई करत, साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. ईडीने एकूण ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. विशेष म्हणजे, हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडी आता पवारांच्या मागे लागल्याचं बोललं जात आहे. एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारखान्यावर ही कारवाई केली.