ETV Bharat / city

BREAKING NEWS: नागपूरात कलम १४४ लागू केली असताना भारतीय जनता पक्षाकडून मोर्चा - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

BREAKING NEWS: एका पर्वाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
TODAYS BIG BREAKING NEWS IN INDIA
author img

By

Published : Nov 15, 2021, 7:11 AM IST

Updated : Nov 15, 2021, 2:21 PM IST

14:18 November 15

एनसीबीची महाराष्ट्राच्या सीमेवर कारवाई, नांदेडमध्ये १.१ टन गांजा पकडला

  • मुंबई - नांदेडमध्ये आज १.१ टन कैनबीन ( गांजा) कन्साईन्मेंट पकडले आहे
  • महाराष्ट्रच्या सीमेवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली आहे.
  • महाराष्ट्र सीमेवर केलेल्या कारवाईत २ जणांना अटक 
  • एक आवडज वाहन जप्त 
  • आंध्र प्रदेशातून गांजाची खेप आल्याची माहिती वानखेडे यांनी दिली  

13:38 November 15

अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी

13:30 November 15

लसीकरणासाठी कोणालाही सक्ती नाहीच, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

औरंगाबाद - कोरोना आजाराला निर्बंध घालण्यासाठी लसीकरण गरजेचे असले तरी नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याने राज्यभर औरंगाबाद पॅटर्न राबवणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राज्यात रंगली आहे. मात्र त्याबाबत कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही, लसीकरण करणे हा सर्वस्वी ऐच्छिक विषय असून, त्याबाबत जबरदस्ती करण्यात येणार नाही. मात्र आम्ही जनजागृती करू असं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

12:53 November 15

नागपूरात कलम १४४ लागू केली असताना भारतीय जनता पक्षाकडून मोर्चा

नागपूर - कोविड -19 महामारीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडीने गरीब जनतेसाठी सेवाकार्य करण्याऐवजी अन्नधान्याचा पुरवठा विभागाकडुन केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या अन्नधान्याचा पुरवठा बंद करण्याचे महापाप केल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी आणि केशरी रेशन कार्डधारकांना धान्य मिळावे या मागणीसाठी भाजपकडून  मोर्चा काढण्यात आला आहे. 

नागपूर शहर पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू केली असताना भारतीय जनता पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला आहे.

12:45 November 15

महाराष्ट्रात ज्या दंगली उसळल्या आहेत त्याआधी राज्यात काय झाले, नितेश राणेंचा महाविकास आघाडी सरकारला सवाल

मुंबई - महविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून जाणून बुजून काही घटना केल्या जात आहेत. गृहमंत्री वळसे पाटील व अन्य मंत्र्यांकडून काही वक्तव्य केली जात आहेत. १३ नोव्हेंबरला अमरावतीत जो मोर्चा निघाला त्यामुळे दंगली झाल्या असे सांगितले जात आहे. हे विश्व हिंदू परिषद, आरएसएस व भाजपची लोक आहेत असे सांगितले जात आहे. पण १३ नोव्हेंबर पूर्वी काय झालं हे सुद्धा बघणे गरजेचे आहे, असे भाजप आमदार नितेश राणेंनी म्हटले आहे.

१२ नोव्हेंबरला देगलुरला मोर्चा काढला गेला. या मोर्चामध्ये जे पोस्टर लावले गेले होते त्या मध्ये भावना भडकवणारे  फलक लावले होते. हा मोर्चा रझा अकादमीच्या वतीने काढण्यात आला होता. त्रिपुरा मध्ये हिंदू संघटनेकडून मस्जिद तोडली गेली असा एक तरी फोटो मला दाखवा. रझा अकादमीला माझे आव्हान आहे. ज्या कारणासाठी नांदेड, मालेगांव, अमरावतीमध्ये जे मोर्चे काढले गेले त्याला काही कारणच नव्हतं. कारण त्रिपुरामध्ये तस काहीच झालं नव्हत.

१२ तारखेला मोर्चा कसा निघाला, त्याची तयारी कशी झाली ती माहिती सुद्धा माझ्याकडे आहे. असा दावा नितेश राणेंनी केला आहे. 

रझा अकादमी कटरपंथी म्हणून काम करते. मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम रझा अकादमी करते. रझा अकादमी काय काम करते. तिहेरी तलाकला विरोध रझा अकादमी ने केला. करोना लसी ला विरोध रझा अकादमी ने केला. लोकशाहीला न मानणारे हे रझा अकादमी ची लोक आहेत. त्याबद्दल कोणी काहीच बोलत नाही. ते मोर्चे काढतात त्याला तुम्ही परवानगी देता. मुंबई मध्ये सुद्धा आझाद मैदानात यांनीच मोर्चे काढले. १९९७ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणारी हीच रझा अकादमी होती.

12:42 November 15

अनिल देशमुख विशेष न्यायालयात हजर, सुनावणी सुरु

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख विशेष न्यायालयात हजर, सुनावणी सुरु

11:19 November 15

मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, जळगाव जिल्ह्यात १५०० किलो गांजा पकडला

  • मुंबई एनसीबीची जळगाव मध्ये मोठी कारवाई
  • 1500 किलो गांजा केला जप्‍त
  • विशाखापटनम मधून आणत होते गांजा
  • दोन जणांना अटक, चौकशी सुरू

10:50 November 15

अनिल देशमुख यांची आज ईडी कस्टडी संपणार

मुंबई - अनिल देशमुख यांची आज ईडी कस्टडी संपत आहे

कोर्टात हजर करण्यापूर्वी अनिल देशमुख यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली 

10:11 November 15

नागपूर शहरात कलम 144 लागू, सोशल मीडिया-गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांची करडी नजर

  •  पोलीस सर्व बाबीसाठी तय्यार आहे, हाय अलर्ट जारी...
  • नागपुरात खबरदारी म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे
  • सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे
  • शहरात जवळपास 32 ते 33 ठिकाण संवेदनशील
  • पोलीस प्रशासनाकडून रूटमार्च काढले जात आहे
  • गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस नजर ठेवून आहे
  • सर्वच धर्म गुरु, मौलवी यांच्यासोबत पोलीस विभागाची चर्चा सुरू
  • नागपुरमधील कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी पोली घेत आहे

10:05 November 15

अमरावतीत बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांच्या अटकेला सुरुवात

अमरावती - अमरावतीत बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांच्या अटकेला सुरुवात

  • भाजपच्या अनेक नेत्यांच्या घरांची पोलिसांकडून झाडाझडती सुरु
  • माजी कृषी मंत्री व भाजपनेते अनिल बोंडे यांना सिटी कोतवाली पोलिसांनी केली अटक
  • भाजपच्या आणखी नेत्यांना अटक होण्याची शक्यता
  • बंद व हिंसाचार प्रकरणी शहरात 15 ठिकाणी एफआयआर दाखल
  • 50 पेक्षा अधिक आंदोलनकर्त्याना आतापर्यंत अटक

10:03 November 15

वर्धा जिल्ह्यात भाजपला धक्का, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वर्धा - भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

- बरेच दिवसापासून नाराज असल्याचे बोलले जात होते, भाजपकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अपयशी   

- करंजी येथील काँग्रेसच्या यात्रेनंतर डॉ. गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

- काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवला होता राजीनामा

09:48 November 15

एसआरएतील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयकर विभागाकडून समन्स

  • मुंबई - एसआरएतील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयकर विभागाकडून समन्स
  • वरिष्ठ अधिकारी शांतीलाल टांक आणि रामा मिटकर यांना आयकर विभागाची नोटीस
  • २२ नोव्हेंबरला चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश
  • 2016 ते 2021 दरम्यान कुटुंबीयांच्या उत्पन्नात वाढ
  • बँक कागदपत्र सादर करण्याचे निर्देश

09:43 November 15

गुजरात एटीएसने सुमारे 120 किलो ड्रग्ज पकडले आहेत. ही माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.

09:43 November 15

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

07:06 November 15

Babasaheb Purandare : एका पर्वाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

07:05 November 15

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य आरास

कार्तिकीचा सोहळा। चला जाऊं पाहूं डोळां। आले वैकुंठ जवळां। सन्निध पंढरीये, या संत तुकारामाच्या अभंगाच्या ओळी प्रमाणे, आज पंढरपूर (pandharpur) येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Temple) समितीच्यावतीने कार्तिकी यात्रे (Karthiki Yatra) निमित्त विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या मंदिरात आकर्षक व मनमोहक अशी रंगीबेरंगी फुलाची आरास (beautiful decoration in Vitthal rukmini temple) करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर अधिकच खुलून दिसत 

06:53 November 15

BREAKING NEWS: एका पर्वाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

भोपाळ -  राष्ट्रीय आदिवासी गौरव दिनाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भोपाळ दौऱयावर आहेत. पंतप्रधान एका विशेष विमानाने 12.35 मिनिटांनी भोपाळ विमानतळावर पोहोचतील. यानंतर ते 1 वाजता हेलिकॉप्टरने जांबोरी मैदानावर पोहोचतील. तेथे कार्यक्रम आटोपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने बीयू कॅम्पसमध्ये पोहोचतील. येथून हबीबगंज रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी रस्त्याने जाणार आहेत.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजीची टीमही भोपाळला पोहोचली आहे. जांबोरी मैदान ताब्यात घेतले आहे. यासोबतच सुरक्षेसाठी बाहेरून पोलिस कर्मचारीही मागवण्यात आले आहेत. भोपाळची वाहतूक व्यवस्था हाताळण्यासाठी सुमारे 1200 वाहतूक कर्मचाऱ्यांना बाहेरून पाचारण करण्यात आले आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी आदिवासी भोपाळला पोहोचू लागले आहेत.

Last Updated : Nov 15, 2021, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.