मुंबई - आज राज्यात ५ हजार ५०५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज ८ हजार ७२८ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ४० हजार ५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६८ टक्के एवढे झाले आहे.
आतापर्यंत एकूण ४४ हजार ५४८ रुग्णांचा मृत्यू
आतापर्यंत एकूण ४४ हजार ५४८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९१ लाख ८५ हजार ८३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ९८ हजार १९८ (१८.४९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३ लाख ३५ हजार ६८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ११ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख १२ हजार ९१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हेही वाचा - आता आल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका.. जाणून घ्या संपूर्ण प्रकिया
हेही वाचा - "अर्णब गोस्वामींची अटक म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी धोक्याची घंटा"