ETV Bharat / city

राज्यात ३ हजार ५८० नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ; ८९ रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना बातमी

आज राज्यात ३,५८० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,०९,९५१ वर पोहचला आहे. राज्यात आज ८९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

corona
corona
author img

By

Published : Dec 24, 2020, 7:32 PM IST

मुंबई - आज राज्यात ३,५८० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,०९,९५१ वर पोहचला आहे. राज्यात आज ८९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९,०५८ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५४,८९१ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५ टक्के -

राज्यात आज ३,१७१ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून, आजपर्यंत एकूण १८,०४,८७१ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ८९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२३,४१,२०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,०९,९५१ नमुने म्हणजेच १५.४८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४,८२,७७९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५४,८९१ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा - खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीतून अटक, काय आहे पुणे कनेक्शन?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.