मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा ( Second Waves of Corona ) आल्या व त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटली ( Mumbai Corona Update ) होती. मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. डिसेंबरमध्ये 200 ते 300 च्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. काल रविवारी त्यात वाढ होऊन 336 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
रविवारी 336 नवे रुग्ण -
19 डिसेंबरला 336 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 67 हजार 127 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 46 हजार 104 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2081 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2288 दिवस इतका आहे. मुंबईमधील 17 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे. रुग्ण शोधण्यासाठी आज 40 हजार 857 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत एकूण 1 कोटी 31 लाख 78 हजार 58 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या दिवशी रुग्णसंख्या 200 च्या वर -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228, 4 डिसेंबरला 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबर 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336 रुग्ण आढळून आले आहेत.
चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद होत होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११, १५ आणि १८ डिसेंबरला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. मृत्यू संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.