मुंबई - राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. मंगळवारी (2 मार्च 2021) दुसऱ्या दिवशी 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 12 हजार 299 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असणाऱ्या 3 हजार 812 लाभार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे.
राज्यात आज एकूण 33 हजार 44 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यांपैकी 26 हजार 522 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 6 हजार 522 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी 5 हजार 822 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला लशीचा डोस देण्यात आला. तर 4 हजार 589 फ्रन्टलाइन वर्कर यांना पहिला डोस देण्यात आला. त्याच बरोबर 6570 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 12 लाख 66 हजार 108 लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली आहे.
जिल्हानिहाय कोरोना लसीकरणाची आकडेवारी
अहमदनगर- 41 हजार 945
अकोला -15 हजार 93
अमरावती -27 हजार 428
औरंगाबाद- 31 हजार 575
बीड- 24 हजार 742
भंडारा- 15 हजार 410
बुलडाणा- 19 हजार 588
चंद्रपूर- 25 हजार 342
धुळे- 15 हजार 815
गडचिरोली- 15 हजार 823
गोंदिया- 16 हजार 894
हिंगोली- 9 हजार 46
जळगाव- 27 हजार 809
जालना- 17 हजार 691
कोल्हापूर- 41 हजार 225
लातूर- 22 हजार 819
मुंबई- 2 लाख 25 हजार 215
नागपूर- 60 हजार 902
नांदेड 18 हजार 677
नंदुरबार 18 हजार 291
नाशिक 53 हजार 343
उस्मानाबाद 32 हजार 405
परभणी 10 हजार 763
पुणे 1 लाख 26 हजार 663
रायगड 19 हजार 917
रत्नागिरी 19 हजार 475
सांगली 29 हजार 823
सातारा 47 हजार 780
सिंधुदुर्ग 10 हजार 975
सोलापूर 38 हजार 459
ठाणे 1 लाख 13 हजार 346
वर्धा 22 हजार 799
वाशिम 9 हजार 538
यवतमाळ 21 हजार 603
राज्यात एकूण लसीकरण - 12 लाख 66 हजार 108