मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी संध्याकाळी ट्विटरद्वारे आज पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले. (Sanjay Raut Today press conference) त्यानंतर, आज सेनाभवनात संध्याकाळी चार वाजता राऊत कुणावर निशाणा साधणार अशी चर्चा सुरू झाली. यावर आता राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते त्यांच्या निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
आज पुरावे सादर करणार
"आजच्या पत्रकार परिषदे मधून मी केंद्रीय तपास यंत्रणा किती पोखरल्या गेल्या आहेत याचा खुलासा करणार आहे. (Sanjay Raut press) यासंदर्भात मी पंतप्रधान मोदी यांना पुराव्यांसह 13 पानी पत्र पाठवलं आहे. आज ते पत्र पुराव्यांसह संध्याकाळी तुम्हालाही देईन." असं राऊत म्हणाले.
-
Will be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTs
">Will be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTsWill be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTs
याला टार्गेट म्हणत नाहीत, आमच्यावर अन्याय होतोय
"तुम्ही देखील काल पासून आता राऊत यांच्या टारगेटवर कोण ?असे मथळे देत आहात. पण, याला टारगेट म्हणत नाहीत आम्ही जे सत्य आहे ते मांडतोय आमच्यावर अन्याय होतोय. समोरचे लोक आमच्यावर हल्ले करतायत आणि स्वतः मात्र कोट्यवधींचे घोटाळे करून नामानिराळे राहतात. त्यांचे हे मुखवटे फाडले पाहिजेत आणि मी तेच काम करतोय."
एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका
"थोड्याच दिवसात आता पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. त्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमातून सध्या एक्झिट पोल दिले जात आहेत. या पोलवर विश्वास ठेवू नका. कारण, अंतिम निकाल हा वेगळच काहीतरी असू शकतो हे आपण पाहिलं आहे. मतमोजणी होऊ द्या मग पुढील चर्चा करू असही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा - Arrested one Terrorist : सोपोर पोलिसांची कारवाई! बीएन सीआरपीएफसह दहशतवादी साथीदाराला अटक