मुंबई- राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांमध्ये घट झाली आहे. मात्र तरी देखील संख्या ही चिंता वाढवणारीच आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात 24 हजार 645 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना स्थिती
राज्यात सोमवारी 24 हजार 645 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 25 लाख 04 हजार 327 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 19 हजार 463 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 22 लाख 34 हजार 330 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 2.13 टक्के एवढे आहे. राज्यात सध्या 2 लाख 15 हजार 241 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील या भागांमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण
मुंबई महानगरपालिका- 3,262
ठाणे- 374
ठाणे मनपा- 655
नवी मुंबई-443
कल्याण डोंबिवली- 705
पनवेल मनपा- 357
नाशिक-586
नाशिक मनपा-685
अहमदनगर- 521
अहमदनगर मनपा-318
धुळे- 126
धुळे मनपा - 172
जळगाव- 680
जळगाव मनपा- 311
नंदुरबार-229
पुणे- 785
पुणे मनपा- 2,365
पिंपरी चिंचवड- 1,195
सोलापूर- 156
सोलापूर मनपा- 103
सातारा - 133
औरंगाबाद मनपा-966
औरंगाबाद-426
जालना-282
परभणी-157
परभणी मनपा-118
लातूर मनपा-115
लातूर 127
उस्मानाबाद-154
बीड -246
नांदेड मनपा-737
नांदेड-354
अकोला- 228
अकोला मनपा-305
अमरावती- 113
अमरावती मनपा- 305
यवतमाळ-227
बुलडाणा-455
वाशिम - 240
नागपूर- 921
नागपूर मनपा-2,741
वर्धा-284
भंडारा-113