ETV Bharat / city

दिलासादायक! राज्यातील रुग्णसंख्येत घट, आज अडीच हजार कोरोनाबाधितांची नोंद - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

आज राज्यात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात केवळ २ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर दिवसभरात ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

today 3 thousand 65 people infected with corona
दिलासादायक! राज्यात आज केवळ ३ हजार ६५ कोरोनाबाधितांची नोंद
author img

By

Published : Nov 15, 2020, 7:09 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याला दिलासा देणारी बातमी आहे. आज राज्यात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात केवळ २ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर दिवसभरात ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ६५ जणांनी आज कोरोनावर मात केली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १७ लाख ४७ हजार २४२ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत १६ लाख १५ हजार ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आजपर्यंत ४५ हजार ९७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. राज्यात ८४ हजार ९१८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्णांच्या संख्येत घट

राज्यात जून महिन्यामध्ये दिवसाला ५४०० रुग्ण आढळत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या दिवसाला १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र आता या रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, तर २६ ऑक्टोबरला ३६४५ रुग्णांची नोंद झाली होती. तर आज सर्वात कमी म्हणजे केवळ अडीच हजार रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा -'बीडची घटना मानवतेला काळिमा फासणारी, सरकारने कठोर कारवाई करावी'

हेही वाचा - 'विधानपरिषद निवडणुकीची खलबते नाहीत; राज्यपालांकडे तर सदिच्छा भेट'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.