ETV Bharat / city

Ajit Pawar : शेतकऱ्यांकडे लक्ष द्या; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

सदैव राज्यात सत्तेत असलेल्या सरकार पेक्षा नेहमी, विरोधी पक्षालाच शेतकऱ्यांची अधिक काळजी वाटत असते. आणि तोच विरोधी पक्ष सत्तेत येताच. परत चित्र बदलते. असाच काही अनुभव यावेळी देखील आलाय. उघड्यावर शेतकऱ्यांचा संसार (To save the lives of farmers in the state)आलेला असून मुख्यमंत्र्यांनी (CM) तात्काळ तिकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करणारे पत्र (Ajit Pawar will give a letter) देणार असल्याचे, अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Ajit Pawar Press Conference
अजित पवार यांची पत्रकार परिषद
author img

By

Published : Aug 2, 2022, 8:13 PM IST

मुंबई : राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री सत्कार सोहळ्यात दंग आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. उघड्यावर शेतकऱ्यांचा संसार (To save the lives of farmers in the state)आलेला असून मुख्यमंत्र्यांनी (CM) तात्काळ तिकडे लक्ष द्यावे. अशी मागणी करणारे पत्र (Ajit Pawar will give a letter) देणार असल्याचे, पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यानंतर ते मुंबईत बोलत होते.

मराठवाड्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. परंतु अजूनही सरकारी मदत मिळालेली नाही. बीडमध्ये गोगलगायमुळे पीक गेले आहे. यामध्ये काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सुरुवातीला काही भागात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला. मात्र, त्यानंतर लक्ष दिले नाही. खरंतर केंद्राच्या पाहणी पथकाला बोलवायला हवे होते. मात्र अजूनही तसे केले नसल्याचे पवार म्हणाले. तसेच राज्याच्या इतर भागात अतीवृष्टी झालेली आहे. तिथे देखील मदत द्यायला हवी. सध्या पीक विम्याचा प्रश्न आहे. अजूनही त्याबाबत निर्णय झालेला नाही. शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आवश्यकता आहे. मात्र,अजूनही त्यावर देखील निर्णय घेतला गेला नसल्याचे; अजित पवार यांनी सांगितले.

संवेदनशुन्य मुख्यमंत्री : राज्यात अतिवृष्टी असतांना मुख्यमंत्री नाशिक, औरंगाबाद मध्ये फक्त मिरवणूक काढत आहे. रात्री उशिरापर्यंत सोहळे करत आहेत. खरंतर 10 वाजल्यानंतर माईक बंद करायचा असतो. मात्र न्यायालयाचे नियम मुख्यमंत्री तोडतात, त्यांना करणार काय? बोलणार काय? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष घालायला हवे. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावे, अशी सूचना केली.

उपमुख्यमंत्र्यांना अधिकारच नाही : शपथविधी होऊन एक महिना झाला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याकडे; अजित पवार यांनी लक्ष वेधले. अजूनही उपमुख्यमंत्र्यांना सह्यांचे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. बऱ्याच फाईल अजूनही थांबलेल्या आहेत. त्यामुळे अनेक काम थांबली असून, जनतेची कामे खोळंबली असल्याचे अजित पवार यांनी यावेळी म्हटले.

अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप रखडले : राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारचे एका महिन्यापासून मंत्रिमंडळ विस्तार रखडले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघच कारभार पाहत आहेत. सोबत आलेल्या 40 आमदारांना दिलेल्या आश्वासनामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने खातेवाटप झालेले नाही. अधिवेशन भरवले जात नाही. राज्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधता येत नाही. मंत्रिमंडळ नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे, पवार यांनी सांगत; राज्यातील नैसर्गिक आपत्ती ग्रस्त नागरिक त्रस्त असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

हेही वाचा : Subodh Bhave : लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचे काम; सुबोध भावेची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.