ETV Bharat / city

Ticket Checking Campaign : 15 दिवसांत ५८ हजार ३३४ फुकट्या प्रवाशांकडून २ कोटी ९४ लाखांचा दंड वसूल - विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान (Ticket Checking Campaign )राबविण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांत मध्य रेल्वेने ५८ हजार ३३४ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून २ कोटी ९४ लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.

Ticket Checking Campaign
Ticket Checking Campaign
author img

By

Published : Jan 18, 2022, 8:18 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान (Ticket Checking Campaign)राबविण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांत मध्य रेल्वेने ५८ हजार ३३४ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून २ कोटी ९४ लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेची कारवाई जोरात -
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जानेवारी-२०२२ च्या पहिल्या १५ दिवसांत विनातिकीट / अनियमित प्रवाशांच्या ५८ हजार ३३४ प्रकरणात २.९४ कोटी दंड वसूल केला आहे. या कालावधीत मास्क परिधान न केलेले ७१५ प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून दंड म्हणून १. ४४ लाख रुपये वसूल करण्यात आले. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२१ ते १५ जानेवारी दरम्यान मुंबई विभागात विनातिकीट व अनियमित प्रवाशांची एकूण १०.१२ लाख प्रकरणे आढळून आली असून त्यांचेकडून ५१. ३१ कोटी दंड वसूल करण्यात आला आहे. गैरसोय टाळण्यासाठी कोरोना संबंधित अनिवार्य केलेल्या सर्व नियमांचे पालन करा तसेच योग्य आणि वैध रेल्वे तिकीटांसह प्रवास करा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

पुरुषांना महिला डब्यातील प्रवास महागात -
महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना रोखण्यासाठी मुंबई उपनगरीय गाड्यांवर तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसह रेल्वे संरक्षण दलाने आयोजित केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान १८८ प्रकरणे आढळून आली आहेत आणि त्यांचेकडून १,२८,०७० दंड वसूल करण्यात आला तसेच १४ ते १६ जानेवारी या कालावधीत २३ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन-
उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे निघालेल्या तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता प्रामुख्याने लक्षात आल्या. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.