ETV Bharat / city

Etv Bharat Special Report : लालपरीचे तिकीट देणाऱ्या दीडशे एजंटवर उपासमारी; हजारों छोट्या व्यावसायिकांना फटका

गेल्या दोन वर्षांनंतर एसटी बसेसचे चाक रुळावर येत असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे (ST Workers Strike ) हत्यार उपसले आहे. एसटीला शासनात विलीन करा या प्रमुख मागणीवरून गेल्या तीन महिन्यापासून बेकायदेशीर संपावर एसटी कर्मचारी गेले आहे. आतापर्यत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात शासनाला अपयश आले आहे.

state transport
state transport
author img

By

Published : Feb 16, 2022, 7:43 PM IST

मुंबई - गेल्या ७२ वर्षांत सर्वांच्या सुख-दु:खात साथ देणारी, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा कणा असणारी ग्रामीण भागाची लाडकी लालपरी अर्थात एसटी चाक गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे. एसटीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटूंबियांना मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील अडीचशेपेक्षा जास्त एसटीचे तिकीट विकणारे एजंटवर संपामुळे उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून ठप्प असल्याने मोठ्या आर्थिक संकट त्यांच्यावर कोसळले आहे. याबाबदचा ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट....

एजंटवर कर्जाचा बोजा वाढला
गेल्या दोन वर्षांनंतर एसटी बसेसचे चाक रुळावर येत असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. एसटीला शासनात विलीन करा या प्रमुख मागणीवरून गेल्या तीन महिन्यापासून बेकायदेशीर संपावर एसटी कर्मचारी गेले आहे. आतापर्यत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात शासनाला अपयश आले आहे. परिणामी एसटीचा संप सुरूच असल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबर आणि एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय एसटी महामंडळावर आधारित असलेले बस स्थानकांवरील छोटे व्यावसायिक आणि तिकीट विक्री करणाऱ्या एजंटना मोठा प्रमाणात फटका बसला आहे. आज राज्यभरातील १६५ एसटीचे तिकीट विकणारे एजंटचा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय भाड्याने घेतलेल्या खोलीचे भाडे देण्यासाठी एजंटकडे पैसे नसल्याने मोठ्या प्रमाणात राज्यातील एसटीच्या तिकीट एजंटवर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे शासनाने या एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मुंबईतील एसटीचे तिकीट एजंट राकेश मोरेकडून करण्यात आली आहे.

एजंटद्वारे १८ लाखापेक्षा जास्त तिकीट विक्री
एसटी महामंडळाच्या तिकीट आरक्षणासाठी पाच प्रकारची सुविधा आहे. त्यापैकी दोन प्रकारच्या सुविधा या अधिकृत एजंटसाठी आहे. यामध्ये खिडकीवरील एजंट आणि आॅनलाईन एजंटचा समावेश आहे. एसटी महामंडळाच्या स्व:ताच्या तीन अधिकृत सुविधा आहे. त्यामध्ये खिडकीवरील आरक्षण, मोबाईलद्वारे, आणि वेब साईटवरून सुद्धा तिकीट आरक्षित केले जातात. तिकीट आरक्षणासाठी खासगी एजंटला 5 टक्के कमीशन दिले जाते. कोरोनापूर्वी एसटीच्या अधिकृत एजंटद्वारे वार्षिक 18 लाख 13 हजार 982 प्रवाशांनी तिकीट आरक्षणाची सुविधा घेतली आहे. तर एसटीच्या अधिकृत सुविधेच्या माध्यमातून तब्बल 59 लाख 10 हजार 79 प्रवाशांनी तिकीट आरक्षणाची सुविधा घेतली आहे.

अन्यथा व्यवसाय करू बंद
कोरोनामुळे गेल्या दीड वर्ष एसटी बंद असल्याने आम्हाला यापूर्वीच मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी आमचा व्यवसाय पूर्वगतीवर येत असताना एसटीचा संपामुळे मोठे नुकसान होत आहे. सध्या प्रति महिना आमचे सरासरी २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून एसटीचे तिकीट विक्री करत आहे. कोरोनापूर्वी प्रत्येक महिन्याला १५ हजार ते २० हजार एसटीचा तिकीट विक्री होत असे. त्यातून आम्हाला २५ ते ३० हजार रुपयांचा नफा व्हायचा. मात्र,कोरोना आणि एसटीचा संपामुळे आमचा एसटीचा तिकीट विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे. असाच संप सुरु राहिल्यास आम्हाला एसटी तिकीट विक्री बंद करावी लागेल अशी प्रतिक्रिया गिरगांवमधील एका एसटी तिकीट एजंटने नाव न छापण्याचा अटीवर दिली आहे.
हेही वाचा - Assembly Speaker Issue : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होणार - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.