मुंबई - मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील जुईनगर ते तुर्भे तुर्भे दरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या रुंदीकरणासाठी आणि प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट गर्डर लाँचिंगसाठी तीन दिवसीय रात्रकाली मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ट्रॅफिक ब्लॉक शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री असणार आहेत.
असा असणार मेगाब्लॉक - मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील जुईनगर ते तुर्भे दरम्यान 800 MT रोड क्रेन वापरून सध्याच्या रोड ओव्हर ब्रिजच्या रुंदीकरणासाठी विद्यमान प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट एफओबी गर्डर लाँचिंगसाठी शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी विशेष रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात करणार आहे. हा ब्लॉक सानपाडा-जुईनगर ते तुर्भे दरम्यान असणार आहे.
या ब्लॉक कालावधीत वाशी, नेरुळ, पनवेलसाठी रात्री 11.09 ते पहाटे 5.53 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी, नेरुळ, पनवेलसाठीच्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि रात्री 11.09 ते सकाळी 6.2 पर्यंत वाशी, नेरुळ, पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर सेवा रद्द राहतील.
हेही वाचा - MLC Election : महाविकास आघाडी एकत्र येणे म्हणजे घोडेबाजार नव्हे - विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ