ETV Bharat / city

Three murders In Malvani : मालवणीत तीन दिवसांत तीघांचा खून; १५ दिवसांत ४ खून - Three murders in three days

तीन दिवसांत तीन खून ( Three murders in three days ) आणि पंधरा दिवसांत एकूण चार खून झाल्यानंतर मालवणी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे एकामागून एक चार खून झाल्यानंतर आता मालवणी पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता मालवणी परिसरात दररोज होणाऱ्या हत्याकांडांना पोलीस कसे आळा घालतात हे पाहावे लागेल.

Three killed in Malvani in three days
मालवणीत तीन दिवसांत तीघांची हत्या
author img

By

Published : Jul 17, 2022, 12:06 PM IST

मलाड - मुंबईतील ( mumbai ) मालवणी परिसरात गेल्या तीन दिवसांत तीन खुनाच्या घटना समोर आल्या ( Murder in Malvani ) आहेत. तर गेल्या १५ दिवसांपासून बोलायचे झाले तर १५ दिवसांत ४ जणांची हत्या ( four murders in fiftheen days ) झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जातेय.

मालवणीत तीन दिवसांत तीघांची हत्या

पहिला खून - गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ जुलैला पहिला खून झाला होता. १४ जुलै रोजी मढ बेटावरील एका लॉजमध्ये ( Madh Island ) ही घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने प्रेयसीचा खून केला ( Boyfriend killed girlfriend ) होता. हे तिथल्या पहिल्या खूनाचे प्रकरण आहे. प्रियकर आणि प्रेयसीमधे वाद होते. त्यामुळे प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याच समोर आले आहे.

दुसरा खून - दुसरी हत्या मालवणी गेट क्रमांक ८ ची आहे. येथे १५जुलै रोजी रात्री पती-पत्नीमध्ये भांडण ( Argument Between Husband And Wife ) झाले. पतीने रागाच्या भराता साला ग्राइंडरने पत्नीची हत्या ( Husband killed Wife )केली, घटनेनंतर मालवणी पोलिसांनी आरोपी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

तिसरा खून - तिसरी हत्या काल म्हणजेच १६ जुलै रोजी दुपारी १२:३०वाजता, मयत तौफीक खान हा मालवणीतील अंबोजवाडी परिसरात शौचालय साठी जात होता, त्याचवेळी १६ वर्षीय आरोपीसोबत दोघांमध्ये भांडण झाले, आणि आरोपींनी तौफीक खानवर चाकूने वार करून त्याची हत्या केली, या घटनेत एका १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीलाही मालवणी पोलिसांनी अटक केली आहे,चौथा खून १५ दिवसांपूर्वी १५ झाला होता.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - तीन दिवसांत तीन खून आणि पंधरा दिवसांत एकूण चार खून झाल्यानंतर मालवणी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे एकामागून एक चार खून झाल्यानंतर आता मालवणी पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता मालवणी परिसरात दररोज होणाऱ्या हत्याकांडांना पोलीस कसे आळा घालतात हे पाहावे लागेल.

हेही वाचा - Muslim Artisans Built Door Frame Of Ram Temple : मुस्लिम कारागिरांनी बनविली अयोध्येच्या राम मंदिराची चौकट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.