मुंबई - गडग एक्स्प्रेस आणि दादर-पुद्दुचरी एक्सप्रेस धडक झाली आहे. या धडकेत पुद्दुचरी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली ( Puducherry Express derail at Matunga station ) आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 11005 दादर ते पुद्दुचरी एक्सप्रेसचे मागील ३ डबे रुळावरून घसरले आहेत. दादरहुन ही एक्स्प्रेस रवाना होताच 9.45 वाजता माटुंगा स्थानकाजवळ गडग एक्स्प्रेस आणि दादर- पुद्दुचरी एक्सप्रेस धडक झाल्याने तीन रेल्वे डबे रुळावरून तीन डबे घसरले आहेत. मात्र, या अपघातात आतापर्यंत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले आहे. यामुळे जलद मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर ही दुर्घटना झाल्यामुळे डाऊन जलद मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे उपनगरीय लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडून पडलेले आहे. याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना लेटमार्क लागले आहेत. मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि रेल्वे कर्मचारी युद्धपातळीवर घसरलेले डब्बे बाजूला करण्याचे काम करत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक.. सासऱ्याला दिला नाही वेळेवर नाश्ता.. सुनेवर रिव्हॉल्व्हरमधून केला गोळीबार..