मुंबई : जी मुबारक हो, मुंबई मे हमला होने वाला है २६/११ की नई ताजी याद दिलाएगा असा मेसेज Threat message to attack Mumbai मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला Mumbai Police Control Room शुक्रवारी रात्री आला आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी रात्रभर कारवाई सुरु आहे. मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षा वाढवली Increased security in Mumbai आहे. पाकिस्तानातील नंबरवरून काल रात्री ११. ४५ वाजता वाहतूक नियंत्रण कक्षास धमकीचा मेसेज आला. त्यानंतर याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०६(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, धमकी देणाऱ्याने WhatsApp वर एकूण सात क्रमांक देखील वाहतूक नियंत्रण कक्षास शेअर केले आहेत. त्यापैकी एक नंबर हा उत्तर प्रदेश एटीएसचा असल्याचे निदर्शनास आले आहे.
क्रमांक उत्तर प्रदेश एटीएसचा ईटीव्ही भारतने ९४५४४००६५० या क्रमांकावर संपर्क साधला असता हा क्रमांक उत्तर प्रदेश एटीएसचा असल्याचे निदर्शनास आले आहे. या नंबरवरील व्यक्तीने हा नंबर यूपी एटीएसचा असून इंटरनेटवर हा नंबर उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच हा नंबर एटीएस अधिकाऱ्याचा असून त्याने नाव सांगण्यास नकार दिला. तसेच पुढे त्याने माहिती दिली की, नुकतेच स्वातंत्र्य दिनापूर्वी पकडलेल्या तीन दहशतवाद्यांना पोलिस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी The three terrorists were interrogated करण्याची प्रक्रिया दहशतवाद विरोधी पथकाने (एएटीएस) सुरू केली आहे. सुरुवातीला तिघांची स्वतंत्रपणे चौकशी करून त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर संशयितांची माहिती गोळा केली जात आहे.
हेही वाचा - मंगळागौरी, विटीदांडूला मान्यता मिळाल्यास तेही आरक्षणाच्या कक्षेत येईल, मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया