मुंबई - ठाणे मनसे जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे, वसई येथील हजारो कार्यकर्ते मनसेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि ठाण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मनसमध्ये पक्षप्रवेश करणारे भाजप आणि शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते कृष्णकुंज निवासस्थानी हजर झाले आहे. ठाणे, पालघर, वसई या शहरातून शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पक्षप्रवेशासाठी आले आहेत.
हेही वाचा - ''विकेटकीपिंगच्या बाबतीत पंत पाळण्यातल्या मुलासारखा'', दिग्गज क्रिकेटपटूने दिले मत