नवी मुंबई - नवी मुंबईतील परिसरातील सिवूडसमध्ये असलेल्या ग्रँड सेंटर मॉलबाहेर एका तरुणावर कोयत्याने 8 दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी हल्ला केला आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या आरोपींना पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई येथील ग्रॅड सेंट्रल माॅलच्या बाहेरून ब्रिजेश पाटील हा तरुण जात होता. दरम्यान, भर रस्त्यावर काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला चढवला व त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ब्रिजेश पाटील हा गंभीर जखमी झाला.
मॉलमधील कामाच्या वादातून हल्ला
ग्रँड सेंटर मॉलमधील माथाडी कामाच्या कंत्राटी वादामुळे हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. हल्ला झाल्यावर मिलींद भोईर, मनोहर नाईक व त्यांचे इतर चार साथीदार यांच्या विरोधात एन.आर.आय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भर रस्त्यावर झालेल्या हल्यामुळे नवी मुंबईतील नागरिक सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थिती करत आहेत.
तपासात वेगळेच आरोपी असल्याचे निष्पन्न
पोलीस ठाण्यात ज्या संशयित आरोपींवर गुन्हा नोंद झाला होता ते आरोपी नसून अन्य आरोपी असल्याचे तपासात उघड झाले आहे. जस्मिन तांडेल व नीलेश तांडेल यांनी चेंबूर येथे राहणाऱ्या एका अमित भट नावाच्या सराईत गुन्हेगाराला ब्रिजेश पटेलला मारण्याची सुपारी दिली होती. अमित भट व निलेश तांडेल यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आणखी तीन आरोपी अटक करणे बाकी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - सिक्कीमचा तरुण तब्बल 14 वर्षांनी जाणार घरी, घरच्यांनी केला होता दशक्रिया विधी