ETV Bharat / city

Third Wave Of Corona : कोरोनाची तिसरी लाट सौम्य.. ICU मध्ये दाखल करण्याची गरज नाही, मृत्यूदरही कमी

कोरोनाची तिसरी लाट राज्यभरात पसरली असताना नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही केवळ खबरदारी बाळगावी प्रशासन सज्जा आहे, असे मत मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आकाश खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे

author img

By

Published : Jan 18, 2022, 5:22 PM IST

Updated : Jan 18, 2022, 5:33 PM IST

third wave of corona
third wave of corona

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट (Third Wave Of Corona ) मुंबईत काहीशी उतरत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसते आहे. राज्यातही अद्याप कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसली, तरी काळजी करण्याची अथवा घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना अतिशय सौम्य लक्षणे दिसत आहेत. या लाटेमध्ये रुग्णांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्याची गरज पडत नाहीये तसेच रुग्णांचा मृत्यूदरही कमी (Mortality rate low in corona third wave ) असल्याचे मत डॉक्टर आकाश खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे.

डॉक्टर आकाश खोब्रागडे
रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. जे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यांना पाच ते सहा दिवसानंतर कोणतीही लक्षणे नसतील तर सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रुग्णालयातून घरी सोडण्यात येत आहे, असेही डॉक्टर खोब्रागडे यांनी सांगितले.
रुग्णाच्या संपर्कातील लोकांची चाचणी नाही -
कोरोना रुग्णाच्या संपर्कात असलेल्या लोकांची चाचणी करण्यात येते. मात्र या लाटेमध्ये संपर्कात आलेल्या लोकांना जर कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसतील तर त्यांची चाचणी केली जात नसल्याचेही डॉक्टर आकाश खोब्रागडे यांनी स्पष्ट केले. या लाटेमध्ये मृत्यूदर अत्यंत कमी असून ज्यांचा मृत्यू झाला आहे. ते अन्य कारणांमुळे मरण पावले असल्याचेही डॉक्टर खोब्रागडे यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jan 18, 2022, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.