ETV Bharat / city

यंदा दहीहंडी होणार नाही.. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्व मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद

author img

By

Published : Aug 23, 2021, 3:18 PM IST

Updated : Aug 23, 2021, 5:14 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (सोमवार) संवाद साधला. यावेळी मंडळानी मुख्यंमत्र्यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

There will be no dahihandi this year - cm Thackeray
यंदा दहीहंडी होणार नाही.. मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला सर्व मंडळाचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्यात दहीहंडी उत्सव साजरा होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यातील गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांच्या प्रमुखांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन, गोविंदा पथकांचा प्रतिसाद

कोरोनाच्या दुसऱ्या लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारकडून रेड सिग्नल दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) महाराष्ट्रातल्या सर्व गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत ऑनलाईन बैठक झाली. दरम्यान, जनतेच्या आरोग्यासाठी काही काळ सणवार, उत्सव बाजूला ठेवू या, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. तर सामाजिक तसेच आरोग्य विषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू या, अशी भावना व्यक्त पथकांच्या प्रतिनिधींनी केली. मात्र, गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही गोविदांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

There will be no dahihandi this year - cm Thackeray
मुख्यमंत्र्यांची सर्व गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत ऑनलाईन बैठक

'संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया'

मुंबईसह राज्यात दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाताे. गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने मुंबई, ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नाही. मानाची हंडी जागेवर फोडण्यासह यंदा छोट्याप्रमाणात का होईना उत्सावाला परवानगी द्यावी, अशी मागणी दहीहंडी पथकांच्या समन्वय समितीने राज्य सरकारकडे केली होती. सर्व गोविदांना लसीचे दोन डोस पूर्ण करत दहीहंडी उत्सव सुरक्षितपणे साजरी करण्याची जबाबदारी आमची असेल अशी ग्वाही देखील समन्वय समितीने दिली होती. मात्र, आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन केले. तसेच शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

'तर नाईलाजाने लॉकडाऊन'

आपली यंत्रणा आजही आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढत आहे. आपण समजूतीने वागलो नाहीत तर या धोक्यातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही, अशी खंत मुख्यमंत्री ठाकरे व्यक्त केली. आरोग्य व्यवस्था सक्षम करत आहोत, एकाच दिवशी ११ लाख लोकांचे लसीकरण करून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. ऑक्सिजन, आय.सी.यु बेडची संख्या वाढवत आहोत. पण ऑक्सिजन निर्मिती ही रोज १२०० ते १३०० मे.टन इतकी मर्यादित आहे. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मे.टनच्या वर गेल्यास नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

सहकार्य कायम ठेवा - अजित पवार

महाराष्ट्रात अजून दुसरी लाट ओसरलेली नाही, त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. डेल्टा प्लस विषाणु घातक आणि वेगाने पसरणारा आहे. हे सगळे सांगितले जात असतांना धोका स्वीकारण्यात अर्थ नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मियांनी आपले सगळे सण उत्सव आतापर्यंत जसे साधेपणाने, घरात राहून साजरे केले आणि शासनाला सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही द्यावे असे आवाहन केले. त्यांनी संसर्ग हाताबाहेर गेला तर आतापर्यंत निर्बंधांचे कठोर पालन करून मिळालेले यश वाया जाईल हेही स्पष्ट केले.

यांची प्रमुख उपस्थिती -

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री सचिन अहीर, माजी आमदार बाळा नांदगांवकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिकेचे आयुक्त आय.एस.चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, बाल टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, डॉ. अजित देसाई, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी, दहिहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी, गोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा - दहीहंडी उत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट, मुख्यमंत्र्यांची गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक

Last Updated : Aug 23, 2021, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.