मुंबई - मुंबईचे पालकमंत्री आमदार अस्लम शेख यांनी मालाड भागातील तुंगा हॉस्पिटलला आज भेट दिली. वरिष्ठ नागरिकांना दिला जात असणाऱ्या लसीकरणाबाबत त्यांची ही भेट होती. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया नोंदवली.
लसीकरणाबाबत घाबरुन जाऊ नका -
लसीकरणाबाबत अजूनही थोडेसे समूह असून आपण लसीकरणामध्ये घाबरून न जाता डॉक्टरांना योग्य प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तसेच लसीकरणाचा कार्यक्रम हा व्यवस्थित चालत असल्याचे सांगितले. लॉकडाऊन बाबत आपली भूमिका स्पष्ट करताना पालकमंत्री यांनी सांगितले की सध्या तरी मुंबईमध्ये लॉकडाऊन लावण्यासारखी बिकट परिस्थिती नसून अजूनही कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊनपासून दूर राहू शकतो.
हे ही वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड; जीन्स-टीशर्ट बंद! सरकारकडून अध्यादेश जारी
वाझे प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास कारवाई -
तसेच सचिन वाझे प्रकरणात आपली प्रतिक्रिया देताना पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की सरकार कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नसून आरोप सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. या कार्यक्रमाद्वारे डॉक्टरांनी सांगितले की, आपण लसीकरणासाठी योग्य ती प्रतिसाद देण्याची गरज आहे व ज्यांचे वय 45 हून जास्त आहे, त्यांनी लस घेणे गरजेचे आहे. तसेच लसी संदर्भात घाबरून न जात थोडी काळजी देखील घेतली पाहिजे.
हे ही वाचा - 'त्या' मर्सिडीजचा मूळ मालक धुळ्यातील; फेब्रुवारीतच विकली होती कार