ETV Bharat / city

'राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका' - आरोग्यमंत्री राजेश टोपे ऑन कोरोना

चीन किंवा बाधित देशांमध्ये महाराष्ट्रातील रहिवासी असलेले नागरिक अडकले असतील, त्यांना केंद्र शासनाच्या मदतीने देशात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

health minister rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Mar 2, 2020, 6:17 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य विभागामार्फत यासंबंधी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून सोशल मीडियावर कोरोनासंबंधी फिरणारे संदेश, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज(सोमवार) विधानसभेत सांगितले.

यासंबंधी आमदार संजय पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की, या विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ हे नाव दिलेले आहे. कोरोनाचा संसर्ग मांसाहार केल्याने होत नाही. यासंबंधी सोशल मीडियावर जे संदेश फिरत आहेत, ते चुकीचे असून पशुपालन आयुक्तांमार्फत सायबर गुन्हे शाखेकडे त्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पूर्णपणे खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनसह १२ देशांतून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात आहे. विमानतळावर तपासणी कशा पद्धतीने केली जाते, हे पाहण्याकरिता लवकरच विमानतळाला भेट देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

जेएनपीटी तसेच अन्य बंदरांवरदेखील तपासणी केली जात आहे. सध्या या आजारावर लक्षणानुसार उपचार पद्धत अवलंबली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक विलगीकरण स्थापन करण्यात आला आहे. संसर्ग रोखण्यासाठी वापरला जाणारा एन-९५ मास्कची राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्धता आहेत. ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स अंतर्गत चार महत्वाच्या डॉक्टरांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे राज्यभर पोस्टर्स, रेडीओ, दूरचित्रवाहिन्यांमार्फत जनजागृती केली जात आहे. पुणे येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूसंदर्भात व्हॉट्सअॅप अफवांमुळे पोल्ट्री उद्योगाचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. याबाबत पशुसंवर्धन आयुक्तांनी सायबर सेलमध्ये चौकशीचे आदेश दिले आहेत. पोल्ट्री उद्योगाचे नुकसान टाळण्यासाठी शासन कटिबद्ध असेल, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानसभेत कोरोनावरील चर्चेच्या उत्तरात सांगितले. चीन किंवा बाधित देशांमध्ये महाराष्ट्रातील रहिवासी असलेले नागरिक अडकले असतील, त्यांना केंद्र शासनाच्या मदतीने देशात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्या प्रणिती शिंदे, भारती लव्हेकर, रोहीत पवार, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, नितेश राणे, अमीन पटेल यांनी भाग घेतला.

हेही वाचा -

अर्थसंकल्पीय अधिवेशन : संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देणाऱ्या मानसिक रुग्णाला कर्नाटकमध्ये अटक..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.