मुंबई - काल राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित काही फोटो ट्वीट केले होते. याला समीर वानखेडे यांनी प्रेस नोट काढत उत्तर दिले. मात्र, आज पुन्हा नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट 'मग हे दाऊद वानखेडे कोण', असा प्रश्न उपस्थित केला आहे.
गेल्या काही नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीच्या आर्यन खान प्रकरणातील कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काल त्यांनी 'पेहचान कौन आणि फर्जिवाडा इथूनच सुरु होतो', अशा कॅप्शनसह काही फोटो ट्वीट करत नवा ट्विस्ट निर्माण केला होता. तसेच लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचे ते म्हणाले होते.
दरम्यान, नवाब मलिकांच्या या ट्वीटला समीर वानखेडे यांनी प्रेस नोट काढत प्रत्युत्तर दिले होते. 'राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी माझ्याशी संबंधित काही कागदपत्रे ट्वीट केले आहेत. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे हिंदु असून ते निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. तसेच माझी आई जाहीदा ही मुस्लीम होती. मी एक धर्मनिरपेक्ष परिवारातील असून मला त्याचा गर्व आहे. माझा 2006 मध्ये डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी माझा विवाह झाला होता. नंतर 2016 मध्ये आमचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मी क्रांती रेडकर यांच्याशी विवाह केला, असे त्या परिपत्रकात सांगण्यात आले.
मात्र, त्याला उत्तर देत एक फोटो ट्वीट केला आहे. 'मग हे दाऊद वानखेडे कोण', असा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे. तसेच त्यांनी एका दुसऱ्या ट्वीटमध्ये शायरीतून समीर वानखेडेंना अप्रत्यक्ष टोलाही हाणला आहे.
-
जब भी जी चाहे, नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे, लगा लेते हैं लोग .
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">जब भी जी चाहे, नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे, लगा लेते हैं लोग .
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021जब भी जी चाहे, नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे, लगा लेते हैं लोग .
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021