मुंबई- सुशांत सिंग राजपूत प्रकरणी दिल्लीवरुन आलेले सीबीआयचे पथक गेले दोन महिने तपास करत आहे. या पथकाला सुशांत सिंग राजपूत मृत्यूचे मुख्य कारण अद्याप मिळालेलं नाही. एम्स कडून मिळालेल्या फॉरेन्सिक अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईत आलेले सीबीआयचे पथक हे पुन्हा दिल्लीला रवाना झाले.
रिया चक्रवर्तीच्या इमारतीत राहणाऱ्या डिंपल थावणी या महिलेने सुशांत सिंग व रिया चक्रवर्ती या दोघांना 13 जूनला एकत्र पाहिल्याचं सुरुवातीला सांगितलं होत. यानंतर सीबीआयच्या पथकाकडून डिंपल थावणी यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने मी सुशांत व रिया चक्रवर्तीला पाहिलं नसल्याचे सांगितले आहे.
सुशांत सिंह व रिया चक्रवती या दोघांना एकत्र आपण पाहिलं नसून, दुसऱ्याकडून त्याबद्दल ऐकलं असल्याचे सीबीआयच्या पथकासमोर डिंपल थावणी यांनी सांगितले. यानंतर सीबीआयच्या पथकाने सदर महिलेला यासंदर्भात कुठलीही ठोस माहिती किंवा प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय वक्तव्य करू, नये असा समज दिला.
दरम्यान, सुशांत सिंग यांच्या मृत्यूनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून तपास केला जात आहे. रिया चक्रवर्तीला ड्रग्स सिंडिकेटच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. तब्बल 28 दिवस न्यायालयीन कोठडीत काढल्यानंतर रिया चक्रवर्तीची मुंबई उच्च न्यायालयाने एक लाखांच्या जामिनावर सुटका केली आहे.