ETV Bharat / city

Water Supply Reduction : मुंबईत पाणी कपात, वैतरणा धरणातून 200 एमएलडी पाणी पुरवठचा प्रयत्न - पाणी कपात

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे 15 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. हा बिघाड दुरुस्त होईपर्यंत पाणी कपात कायम राहणार ( Water Supply Reduction ) आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीच्या संकट उभे राहिल्याने मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वैतरणा धरणातून 200 एमएलडी पाणी पुरवठा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Municipal Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
author img

By

Published : Mar 2, 2022, 9:52 PM IST

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे 15 टक्के पाणी कपात ( Water Supply Reduction ) करण्यात आली आहे. हा बिघाड दुरुस्त होईपर्यंत पाणी कपात कायम राहणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीच्या संकट उभे राहिल्याने मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वैतरणा धरणातून 200 एमएलडी पाणी पुरवठा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Municipal Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली.

दुरुस्ती होई पर्यंत पाणीकपात - मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांमध्ये भातसा हे महत्त्वपूर्ण धरण आहे. या ठिकाणी वीजनिर्मिती केंद्र असून येथे 15 मेगाव्हॅट वीजनिर्मितीही केली जाते. मात्र, या वीजनिर्मिती केंद्रात रविवारी ( दि. 27 फेब्रुवारी ) पाणी शिरल्याचा प्रकार घडला. सुदैवाने यावेळी कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखून वेळीच व्हॉल्व्ह बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, तोपर्यंत वीजनिर्मिती केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने वीजनिर्मिती आणि मुंबईच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. या बिघाडाची व्याप्ती मोठी असल्याने ही दुरुस्ती कधी होईल याची निश्चिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. मुंबईकरांनी पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबाबत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बुधवारी ( दि. 2 मार्च ) स्थायी समितीत याबाबत प्रश्न उपस्थित केला असता बिघाड दुरुस्त होईपर्यंत पाणी कपात कायम राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

वैतरणामधून २०० एमएलडी पाण्याची पर्यायी व्यवस्था - पॉवर हाऊसमध्ये पाणी शिरल्याने दुरुस्तीची व्याप्ती मोठी आहे. दुसरे गेट सुरू करून पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते याबाबतही चाचपणी सुरू आहे. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून वैतरणा धरणातून 200 एमएलडी पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे 15 टक्के असलेली पाणी कपात कमी केली जाईल. मात्र, बिघाड दुरुस्त झाल्याशिवाय पाणी कपात रद्द केली जाणार नाही, त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा - गोरेगाव खंडणी प्रकरणातील आरोपी रियाज भाटीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.