ETV Bharat / city

साक्षी आणि प्रतीक्षा दाभेकरचे शैक्षणिक पालकत्व नगरविकास मंत्र्यांनी स्वीकारले - Sakshi Dabhekar Guardianship Eknath Shinde

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनींना अपंगत्व आले. या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासोबतच साक्षीला सर्वोत्कृष्ट कंपनीचा कृत्रिम पाय बसवून तिला पुन्हा तिच्या पायावर उभी करू, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Sakshi Dabhekar Guardianship
साक्षी दाभेकर पालकत्व
author img

By

Published : Aug 13, 2021, 4:22 AM IST

मुंबई - रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनींना अपंगत्व आले. या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासोबतच साक्षीला सर्वोत्कृष्ट कंपनीचा कृत्रिम पाय बसवून तिला पुन्हा तिच्या पायावर उभी करू, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतील केईएम रुग्णालयात जाऊन त्यांनी दाभेकर कुटुंबाची भेट घेतली. यावेळी डॉक्टरांशी बोलून त्यांनी साक्षीच्या तब्येतीची चौकशी केली.

हेही वाचा - मुंबईतील सहा वर्षाच्या अबू झर शेखला उपचारासाठी 16 कोटींच्या इंजेक्शनची गरज

संपूर्ण उपचार खर्च करणार

रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील केवनाळे या गावात घराची भिंत कोसळत असताना 2 वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी 14 वर्षांच्या साक्षी दाभेकरने आपल्या जिवाची बाजी लावली. मात्र, या दुर्घटनेत पायावर भिंत कोसळल्याने तिला तिचा डावा पाय उपचारादरम्यान गमवावा लागला. कबड्डी, खो-खो यांसारख्या खेळामध्ये प्रवीण असलेल्या साक्षीला पाय गमवावा लागल्याने मोठे नैराश्य आले होते. त्यासोबतच तिची बहीण प्रतीक्षा हिच्या पुढील शिक्षणाची देखील चिंता तिला सतावत होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज केईएम रुग्णालयात जाऊन शिंदे यांनी दाभेकर कुटुंबाला भेट घेऊन आश्वासन दिले. तसेच, साक्षी आणि तिची बहीण प्रतीक्षा यांची शैक्षणिक जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली असून दोघींना तातडीचा दिलासा म्हणून आर्थिक मदत दिली जाईल. साक्षीच्या पुढील उपचारांचा खर्च श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन वर्षभरात करणार

महाडमधील दरडग्रस्त तळीये, पोलादपूरमधील केवनाळे, साखर, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर आणि हुम्बनाळे यांसारख्या दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन लवकरच सुरक्षित जागी करण्यात येईल. यासाठी सुरक्षित जागांचा शोध सुरू असून लवकरच या जागा निश्चित करून येत्या वर्षभरात त्यांचे पुनर्वसन नवीन जागी करण्यात येईल, असे अश्वासन शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले.

हेही वाचा - Corona Update : राज्यात कोरोना रुग्णसंख्येतील चढउतार कायम, आज ६,३८८ नवे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.