मुंबई - राज्यात पुराचा तडाखा सहा जिल्ह्यांना बसला आहे. पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारकडून मंगळवारी 11 हजार 500 कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मात्र, जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने शेतकरी आणि व्यापार्यांपर्यंत पोहोचवावी. नाहीतर, कॉन्ट्रॅक्टरपर्यंत ही मदत पोहोचेल, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला. तसेच जाहीर केलेली मदत ही पुरेशी नसून यापेक्षाही अधिक मदत राज्य सरकारने करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारकडून मदत जाहीर केल्यानंतर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
'जाहीर केलेली मदत राज्य सरकारने शेतकरी, व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवावी'
"आम्ही घोषणा करणार नाही, मदत जाहीर करू" असं म्हणणारे मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केले. त्यामुळे ही मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या 60 टक्के नागरिकांपर्यंत अद्याप राज्य सरकारची मदत पोहोचलेली नाही.