ETV Bharat / city

Operation Ganga Mumbai : युक्रेनमधून १८२ भारतीयांचे सातवे ऑपरेशन गंगा विमान मुंबईत पोहोचले - बुखारेष्टमधून भारतीय मुंबईत परतले

युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विमान बुखारेस्टहून मुंबईत पोहोचले. ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारने चार केंद्रीय मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे. दरम्यान, अजूनही हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांसाठीही केंद्र सरकारकडून आणखी विमानांची व्यवस्था केली जात आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ भारतीय नागरिकांना घेऊन सातवे ऑपरेशन गंगा विमान बुखारेस्टहून मुंबईत पोहोचले

author img

By

Published : Mar 1, 2022, 8:19 AM IST

Updated : Mar 1, 2022, 7:56 PM IST

युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ भारतीय नागरिकांना घेऊन सातवे ऑपरेशन गंगा विमान बुखारेस्टहून मुंबईत पोहोचले. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यांनी या मुलांना मायदेशी सुखरुप परतल्याच्या शुभेच्छा दिल्या. रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्याना त्याची झळ बसली आहे. हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी भारतीय सरकारचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. चार केंद्रीय मंत्री या कामावर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याकडून दररोज झालेल्या कामाची माहिती घेत आहेत.

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी युक्रेनमधून भारतात आलेल्या नागरिकांचे स्वागत केले

ऑपरेशन गंगा

याच प्रयत्नांच्या पार्श्वभूमिवर ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे. याद्वारे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सुमारे १२०० विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकत आहेत. त्यांनाही लवकरात लवकर परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे भारत सरकारबरोबर सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत. काही विद्यार्थी आधीच परत आलेले आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विमानांची सोय करण्यात येत आहे.

  • The seventh Operation Ganga flight with 182 Indian nationals stranded in Ukraine reached Mumbai from Bucharest (Romania)

    Union Minister Narayan Rane received Indian students at Mumbai airport. pic.twitter.com/UVvvuhjhRr

    — ANI (@ANI) March 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान मोदींची बैठक

पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात कालच एक विशेष बैठक घेतली. या बैठकीला कॅबिनेटमधील महत्वाचे मंत्री उपस्थित होते. त्यांच्याबरोबर बातचित करुन काही मंत्र्यांना युक्रेन शेजारील देशामधेय पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रुमानिया आणि इतर देशांमध्ये हे मंत्री जातील. तिथे भारतीयांच्या परत येण्यासाठी ते स्वतः लक्ष घालतील. तसेच तिथेच योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करतील.

युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी मुंबईत दाखल

एअर इंडियाचे (Air India) पहिले विमान युक्रेनमध्ये (Students Stuck Ukraine) अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई विमानतळावर २६ फेब्रुवारी रोजी पोहोचले. युक्रेनमधून रोमानियाला आल्यानंतर तेथून एकूण २१९ विद्यार्थी मुंबईत दाखल झाले. केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होत्या.

पियुष गोयल यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत -

युद्धग्रस्त युक्रेनमधून ( Russia Ukraine Crisis ) विमानाद्वारे येत असलेल्या भारतीयांसाठी ( Indians Arriving From Ukraine ) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai ) विशेष कॉरिडॉर स्थापन करण्यात आला ( First Rescue Plane Will Reaching Mumbai ) होता. युक्रेनमधून येणाऱ्या भारतीयांकडे कोविड लसीकरण प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. दरम्यान, या विमानाने रोमानियातून उड्डाण केले होते.

Last Updated : Mar 1, 2022, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.